आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Home Minister Rajnath Singh Survey Of Flood Hit Jammu And Kashmir

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जम्मू-कश्मीरात पुराचे थैमान, 150 जणांचा मृत्यु, शेकडो वाहून गेले पाकिस्‍तानात?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जम्मू/श्रीनगर- जम्मू-कश्मीरमध्ये गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे हाहाकार माजला आहे. मृतांचा आकडा 150 वर पोहोचला आहे. तर शेकडो लोक पाकिस्तानात वाहून गेल्याची भीतीही वर्तवली जात आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आज (शनिवार) पूरग्रस्त भागाची हेलिकॉप्टरमधून पाहाणी करणार आहे.

जम्मूसह परिसरात होणार्‍या मुसळधार पावसामुळे शुक्रवारी झालेल्या पूर आणि भूस्खलनामुळे 24 जणांचा मृत्यू झाला. उधमपूरमध्ये भूस्‍खलनामुळे आठ लोक मृत्यूमुखी पडले. राज्यात आतापर्यंत 150 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. शेकडो लोक बेपत्ता आहेत. काही लोक झेलम नदीच्या पुरात वाहून गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अनेक मार्ग बंद करण्‍यात आले आहे. त्यामुळे राज्यातील अनेक गावांशी संपर्क तुटला आहे. तसेच पावसाचा जोर वाढल्याने शेकडो गावांना सतर्कतेचा इशारा जारी करण्‍यात आला आहे.

शेकडो लोक वाहून गेले पाकिस्तानात...
जम्मू-काश्मीरमध्ये सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी- नाल्यांना पूर आला आहे. पूरात वाहून शेकडो लोक वाहून गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही लोक पाकिस्ताना वाहून गेल्याची शक्यता आहे. राज्यातील झेलम, चिनाब, तवी, मुनावर, पुलस्तर या प्रमुख नद्या पाकिस्तानच्या दिशेने वाहतात. नद्यांना आलेल्या पुरामुळे अनेक गावे उद्घवस्त झाली आहेत. अनेक गावे रिकामे करण्‍यात आली असून गावकर्‍यांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्यात आले आहे.

वीज, मोबाइल आणि इंटरनेट सेवा ठप्प...
राज्यातील काही जिल्ह्यात वीज, मोबाइल आरि इंटरनेट सेवा ठप्प झाली आहे. केंद्र सरकारने मदतकार्यात एनडीआरएफचे सहा पथके पाठवली आहेत. लष्काराचे जवानही पूरग्रस्तांची मदत करत आहेत. हेलिकॉप्टरच्या माध्यमातून मदतकार्य युद्धपातळीवर सुरु आहे.

शुक्रवारी राजोरी जिल्ह्यातील थन्नामंडी भागात एक घर कोसळले. यात एकाच कुटूंबातील 13 लोकांचा मृत्यू झाला आहे. कंडी कोटरंका बगियाल भागात एक कुटूंबातील तीन जनांचा मृत्यू झाला आहे.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून छायाचित्रांमधून पाहा, जम्मू-काश्मीरमधील हाहाकार...
(फोटोः पूरग्रस्ताना सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे)