आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Home Ministers Seeks Report From Haryana Govt On Communal Tensions

PHOTOS: हरियाणात धार्मिक स्थळावरुन तणाव, केंद्र सरकारने मागितला अहवाल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पलवल (हरियाणा)- हथीन येथील एका जून्या आणि मोडकळीस आलेल्या धार्मिक स्थळावरुन मंगळवारी रात्री दोन समुदायांमध्ये झालेल्या संघर्षानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने हरियाणा सरकारकडून घटनेचा अहवाल मागवला आहे. एका धार्मिकस्थळी कथित अवैध बांधकामावरुन मंगळवारी समाजकंटकांनी डजनभर दुकाने आणि वाहनांना आग लावली. आग विझविण्यासाठी सहापेक्षा जास्त बंब घटनास्थळी दाखल झाले होते. समाजकंटकांनी घटनास्थळी आलेले जिल्हाधिकारी के.एम. पांडुरंग यांच्या गाडीलाही आगीच्या भक्षस्थानी दिले होते. तणावग्रस्त परिस्थिती पाहात, जिल्हा प्रशासनाने शहरात संचारबंदी लागू केली.
फरिदाबादपासून जवळपास 60 किलोमीटरवर हथीन हे गाव आहे. हथीनमधील तणाव आणि जाळपोळीच्या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस महासंचालक ममता सिंह, जिल्हाधिकारी पांडुरंग, पोलिस अधिक्षक पतराम सिंह घटनास्थळी दाखल झाले. बुधवारी रात्री रॅपिड अॅक्शन फोर्सच्या (आरएएप) दोन कंपन्या हथनीमध्ये दाखल झाल्या. शहरात आता तणवापूर्ण शांतता आहे.
गेल्या महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीआधी काही दिवस हथीनमधील एका जुन्या धार्मिक स्थळी अवैध बांधकाम करण्याच्या मुद्यावरुन दोन समुदायांमध्ये वाद झाला होता. तेव्हा राजकीय पक्षाच्या नेत्यांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रशासनाच्या मध्यस्थीने वाद निवळला होता. यावर निवडणुकीनंतर निर्णय घेण्याचे तेव्हा ठरले होते. मात्र, मंगळवारी रात्री अचानक काही लोक धार्मिकस्थळी दाखल झाले आणि कार्यक्रम करु लागले. त्याला दुसर्‍या समुदायाने विरोध केला. यावरुन दोन्ही समुदायांमध्ये शिवीगाळ आणि मारामारी सुरु झाली. त्यानंतर समाजकंटकांनी अफवा पसरवून तोडफोड सुरु केली.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, घटनास्थळाची छायाचित्र