आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Home Ministry Report Stating That There Is More Communal Violence During UPA 2

मोदी सरकारच्या काळात UPA-2 पेक्षा कमी धार्मिक तणाव : गृह मंत्रालय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - असहिष्णुतेच्या मुद्द्यावर सुरू असलेल्या चर्चेदरम्यान एक नवा रिपोर्ट समोर आला आहे. त्यात करण्यात आलेल्या दाव्यानुसार देशात गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी धार्मिक तणावाचे प्रकार घटले आहेत. गृह मंत्रालयाच्या रिपोर्टमध्ये करण्यात आलेल्या दाव्यानुसार, मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर आतापर्यंत युपीए-2 च्या काळातील सरकारच्या तुलनेत धार्मिक तणावाच्या घटना कमी झाल्या आहेत. या घटनांमध्ये मरणाऱ्यांची संख्याही कमी दाखवण्यात आली आहे. 2015 मध्ये ऑक्टोबरपर्यंत अशा घटनांमध्ये 86 जणांनी प्राण गमावले. याच काळात गेल्यावर्षी हा आकडा 90 वर होता.

रिपोर्टमध्ये करण्यात आलेल दावा...
> रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, 2014 मध्ये ऑक्टोबरपर्यंत लहान मोठ्या 630 दंगली झाल्या होत्या. यावर्षी ऑक्टोबरपर्यंत अशा 561 घटना घडल्या आहेत.
> मंत्रालयाच्या मते, 2013 मध्ये युपीए गव्हर्नमेंटमध्ये धार्मिक हिंसाचाराच्या घटनांचा आकडा 694 होता. त्यात मुजफ्फरनगर (युपी) च्या मोठ्या दंगलीचाही समावेश आहे. या दंगलीत सुमारे 65 जणांनी प्राण गमावले होते.
> ऑक्टोबर 2015 पर्यंत धार्मिक हिंसेत 1,899 जण जखमी झाले. गेल्यावर्षी एकूण 644 गटनांमध्ये 95 जण ठार तर 1,921 जण जखमी झाले.
> 2013 मध्ये मोठ्या दंगली झाल्या होत्या. त्यात धुळे (महाराष्ट्र) आणि मुजफ्फरनगरच्या मोठ्या दंगलींचा समावेश आहे. त्यात एकूण 70 मृत्यू आणि 100 जण जखमी झाले होते.
> 2014 मध्ये एनडीएच्या कार्यकाळात सहारनपूर (यूपी) मध्ये मोठ्या दंगली झाल्या होत्या. त्यात ३ जणांचा मृत्यू झाला होता. तर 23 जखमी झाले होते.
> 2015 मध्ये आतापर्यंत कोणतीही मोठी दंगल झालेली नाही.

#Intolerance : दर महिन्याला वाढत गेला वाद
> गोमांस खाल्ल्याच्या संशयात युपीच्या दादरीमध्ये एका व्यक्तीची हत्या आणि कन्नड लेखक कलबुर्गी यांच्या हत्येनंतर इनटॉलरन्सचा मुद्दा भडकला आणि पुरस्कार परत करण्यास सुरुवात झाली.
> 40 पेक्षा अधिक लेखकांनी साहित्य अकादमी पुरस्कार परत केले. 13 इतिहासतज्ज्ञ आणि काही वैज्ञानिकांनीही राष्ट्रीय पुरस्कार परत केले.
> दिबाकर बॅनर्जीसह 10 चित्रपट निर्मात्यांनी पुरस्कार परत केले.
> लेखिका अरुंधती रॉय आणि ‘जाने भी दो यारो’ चित्रपटाचे डायरेक्टर कुंदन शहा यांनी राष्ट्रीय पुरस्कार परत करण्याची घोषणा केली. इतर 24 जणांनीही पुरस्कार परत केले.
>सर्वांनीच देशात असहिष्णुता वाढल्याचा आरोप केला आहे. मोदी सरकार काही करत नसून पंतप्रधानही शांत आहेत.
> पुरस्कार परत करण्याच्या मोहिमेच्या विरोधात काही जणांनी मोहीम सुरू केली. काही दिवसांपूर्वी अभिनेते अनुपमखेर यांनी मार्च फॉर इंडियाचे आयोजन केले. त्या माध्यमातून त्यांनी पुरस्कार परत करणाऱ्यांचा विरोध केला.
> याच दरम्यान जम्मू काश्मीरमध्ये बीफ पार्टी देणारे आमदार राशिद यांनी इतर आमदारांनी मारहाण केली.
> पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कसुरी यांना बोलावल्याच्या मुद्द्यावरून शिवसैनिकांनी सोहळ्याचे आयोजक आणि माजी भाजप नेते सुधींद्र कुलकर्णी यांच्यावर शाईफेक केली. शिवसेनेने गझल गायक गुलाम अलींचा कार्यक्रमही उधळून लावला.
> भाजपचे सरकार असलेल्या राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये एका आर्ट समिटमध्ये सिद्धार्थ कलवार नावाच्या कलाकाराला मारहाण झाली. कलवार यांनी गायीचा पुतळा फुग्याच्या मदतीने हवेत लटकावला होता. त्यावर पीपल फॉर अॅनिमल संस्थेच्या लोकांनी त्यांना मारहाण केी. पोलिसांनीही त्यांना अटक केली.
> या घटनाही असहिष्णुतेशी जोडल्या गेल्या.

काही वक्तव्यांनी सावरले काहींनी वातावरण आणखी बिघडवले
> राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मुद्यावर अनेकवेळा त्यांचे मत मांडले आहे.
> दिल्लीमध्ये नुकत्याच झालेल्या आयडिऑलॉजिस्टच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी म्हणाले होते की, जगभरात इनटॉलरन्चे वातावरण चांगलेच खराब झाले आहे. त्यापूर्वी त्यांनी नेशनल प्रेस डेत्या वेळी म्हटले होते की, नॅशनल अवॉर्ड हे अत्यंत मेहनत, टॅलेंट आणि गुणवत्तेच्या मोबदल्यात मिळत असतात. ते पुरस्कार मिळणाऱ्यांनी त्यांचा मान ठेवायला हवा. कारणांवर भावना वरचढ होता कामा नये. अपला विरोध वादविवादाच्या माध्यमातून जाहीर करावा.
> पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंग्लंड दौऱ्याच्या वेळी म्हटले होते की, भारत हा गांधी आणि बुद्धांचा देश आहे. आम्ही अशा सर्व घटनांकडे गांभीर्याने पाहतो आणि कायद्यानुसार कारवाई करतो.
>मोदींचे परराष्ट्र राज्यमंत्री जनरल व्ही.के.सिंह यांनी काही दिवसांपूर्वी पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केले. या मुद्यावर विनाकारण चर्चा सुरू आहे. पैसे देऊन सरकारच्या विरोधात वातावरण निर्मिती केली. केवळ काही पक्षांनी बिहारच्या निवडणुकांपुरता हा मुद्दा उपस्थित केला होता, असे ते म्हणाले.
> इन्टॉलरन्सचा मुद्दा भडकावल्याचे आरोप राज्यपालांवरही होत आहेत. पश्चिम बंगाल भाजपचे माजी ध्यक्ष आणि सध्या त्रिपुरा येथील राज्यपाल असलेले तथागत रॉय यांनी नुकतेच म्हटले होते की, मुस्लीम जेव्हा खुलेपणे पोर्क खातील तेव्हाच देशातील #Intolerance चा वाद बॅलेंस होईल.
> तर आसामचे गव्हर्नर पीबी आचार्य म्हणाल होते की, हिंदुस्थान केवळ हिंदुंसाठी आहे. ते म्हणाले की, नॅशनल रजिस्टर फॉर सिटीझन्समध्ये कोणत्याही बांगलादेशीचे नाव यायला नको.