आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खास रेल्वे कोचमध्ये शाही थाटात साजरा करा HONEYMOON!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंदिगड - हेरिटेज ट्रॅकवर शाही थाटात मधुचंद्र साजरा करण्यासाठी आयआरसीटीसीने सोमवारी कालका ते सिमलादरम्यान ‘हनीमून कोच’ सुरू केला. हा डबा चार जोडप्यांसाठी तयार करण्यात आला आहे. त्याचे भाडे ५,९०० रुपये असेल. कालकाहून सिमला येथे पोहोचण्यासाठी सहा तास लागतील.

आयआरसीटीसीचे कैलाशचंद्र म्हणाले की, शिवालिक क्वीन नावाचा हा डबा सोमवारी कालका येथून सकाळी ८.३० वाजता निघेल व मंगळवारी सिमला येथून परतेल. इंग्रजांनी १९०३ मध्ये खास आपल्या नागरिकांसाठी हा डबा तयार करवून घेतला होता. बुकिंगसाठी shubham@irctc.com वर मेल करता येईल.

डब्याचे वैशिष्ट्य : एका डब्याची चार भागांत विभागणी करण्यात आली आहे. प्रत्येक भाग उत्कृष्टरीत्या सजवण्यात आला आहे. सर्व भागात सोफ कम बेड लावण्यात आले आहेत.