आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हनीप्रीत, आदित्य इन्सान अजूनही फरारच; नेपाळला पळून गेल्याची शक्यता

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंदिगड - हनीप्रीत इन्सान आणि आदित्य इन्सान हे गुरमीत राम रहीम याचे दोन प्रमुख शिष्य अजूनही फरारच आहेत. मात्र, त्यांना लवकरच पकडण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यांना पकडण्यासाठी मुंबई आणि नेपाळजवळील भागात छापे टाकण्यात येत आहेत, अशी माहितीही पोलिसांनी दिली.
 
 
हरियाणाचे पोलिस महासंचालक बी. एस. संधू यांनी सांगितले की, आम्ही इतर राज्यांतील पोलिसांच्या संपर्कात आहोत आणि हनीप्रीत इन्सान, आदित्य इन्सान यांना लवकरच अटक करण्यात येईल, असा आम्हाला विश्वास वाटतो. पोलिसांनी हनीप्रीतच्या शोधासाठी उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खिरी येथे एक पथक पाठवले आहे. हनीप्रीत भारत-नेपाळ सीमेतून नेपाळला गेली असावी, असा संशय आहे. संधू म्हणाले की, हनीप्रीत आणि आदित्य यांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन डेरा सच्चा सौदाचे सिरसा येथील प्रमुख विपश्यना इन्सान यांनी केले आहे.
बातम्या आणखी आहेत...