आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हनीप्रीतचे शाळेपासून ते लग्नापर्यंतचे फोटोज, राम रहीमचा असा घेतला आशीर्वाद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रोहतक - 39 दिवसांपासून फरार असलेल्या हनीप्रीतला पोलिसांनी आज अटक केली. नुकत्याच एका न्यूज चॅनलला दिलेल्या मुलाखतीत हनीप्रीत आपली बाजू मांडताना अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडले, परंतु विश्वास गुप्ताबद्दल चकार शब्द बोलली नाही. हनीप्रीत आणि राम रहीमच्या नात्याबद्दल अनेक प्रकारच्या चर्चा झाल्या. या सर्वात हनीप्रीतच्या क्लासमेट राहिलेल्या एका व्यक्तीने सांगितले की, हनीप्रीतचे बाबा राम रहीमशी लग्नाच्या आधीपासूनचे कनेक्शन आहे.
 
बाबाने डेऱ्यात लावले होते लग्न वाचा पूर्ण स्टोरी 
क्लासमेटने सांगितली शाळेच्या दिवसांतील आठवण...
- शाळेच्या दिवसांत हनीप्रीतसोबत शिकणाऱ्या डॉ. समीर टुटेजाने सांगितले की, त्या वेळी हनीप्रीतही इतर मुलींप्रमाणेच नॉर्मल होती. आता मीडियात पब्लिश झाल्यावरच कळले की, आमच्यासोबत शिकणारी प्रियंका तनेजाच हनीप्रीत आहे.
 
हनीप्रीतचे वडील राम रहीमचे कट्टर समर्थक
- हनीप्रीतचे वडील रामानंद तनेजा व आई आशा तनेजा फतेहाबादचे राहणारे आहेत. हनीप्रीतचे नावही प्रियंका तनेजा होते.
- रामानंद तनेजा बाबाचे कट्ट भक्त आहेत. त्यांनी त्यांची सर्व प्रॉपर्टी विकल्यानंतर आता डेऱ्या सच्चा सौदामध्ये दुकान चालवत आहेत.
- त्यांना आणखी एक मुलगी आहे, तिचे लग्न झालेले आहे. हनीप्रीत विवाहित आहे, परंतु तिचा घटस्फोट झाला आहे.
 
माजी पतीचे गंभीर आरोप
- वास्तविक, हनीप्रीतचा माजी पती विश्वास गुप्ताने अनेक गंभीर आरोप बाबा आणि हनीप्रीत केले होते. यानंतर हे प्रकरण कोर्टात गेले आणि दोघांचा घटस्फोट झाला.
- याप्रकरणी हनीप्रीतच्या माजी पतीने चंदिगडमध्ये दोन वेळा प्रेस कॉन्फरन्स आयोजित केली होती.
- परंतु विश्वास गुप्तावर हनीप्रीतकडून अनेक प्रकरणे दाखल करण्यात आली तेव्हा त्याने ही केस परत घेतली.
- मग दुसऱ्या प्रेस कॉन्फरन्स आयोजित करून म्हटले की, आम्ही काही लोकांच्या भूलथापांना बळी पडलो, पण असे काहीच नाही.
 
यामुळे बदलले प्रियंका नाव
- एका टीव्ही चॅनलनुसार, हनीप्रीत चित्रपटांत शूटिंग करून आपल्या डेऱ्यात परत यायची तेव्हा डेराप्रेमी तिच्यावर कॉमेंट्स करायचे, तिला पाहून गाणेही म्हणायला लागायचे.
- माजी डेरा समर्थक हंसराज म्हणाले की, 2011 मध्ये आलेल्या पंजाबी चित्रपट 'यार अनमुल्ले' मध्ये जट टिन्का गाण्यात प्रियंकाचे नाव यायचे, मग काय हनीप्रीत दिसली रे दिसली की लोक हेच गाणे म्हणायला लागायचे.
- गाण्यामध्ये प्रियंका नाव ऐकताच राम रहीम खूप चिडायचा. यामुळेच प्रियंका हे नाव बदलून तिने हनीप्रीत ठेवल्याचे समजते.
- बाबा राम रहीमला त्याच्या हनीप्रीतला कुणी असे छेडणे आणि वाईट नजरेने पाहणे, बिल्कुल आवडत नव्हते.
- तिला एकटी पाहून कुणी छेडू नये म्हणूनच राम रहीम नेहमी तिला सोबत ठेवून फिरायचा.
 
शाळेच्या दिवसांतच झाली होती बाबा आणि हनीप्रीतची भेट
- काही दिवसांपूर्वी हनीप्रीतच्या शेजाऱ्याने दावा केला आहे की, राम रहीमची हनीप्रीत ऊर्फ प्रियंका तनेजाची भेट शाळेच्या दिवसांतच झाली होती.
- शेजाऱ्याने सांगितल्यानुसार, हनीप्रीत राम रहीमच्या संपर्कात लग्नाच्या खूप दिवसांपूर्वीच आली होती, फतेहाबादमध्ये तिच्या साखरपुड्यालाही बाबा हजर होता.
- शेजारी म्हणाला, हनीप्रीतच्या साखरपुड्याला बाबाची उपस्थिती असल्याने हनीप्रीतच्या घरासोबतच मेन हायवेलाही सजवण्यात आले होते.
- राम रहीम हनीप्रीतच्या साखरपुड्याला एका टू-सीटर बीएमडब्ल्यू गाडीत आला होता. विधी पूर्ण झाल्यावर त्याने या गाडीतच हनीप्रीतला डेऱ्यामध्ये सोबत नेले. यानंतर हनीप्रीतचे लग्न डेऱ्यामध्येच पार पडले.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, हनीप्रीतचे आणखी काही फोटोज...
बातम्या आणखी आहेत...