आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हनीप्रीत 10 बाय 14 च्या बराकीत, पांघरायला फक्त एक कांबळ; या तुरुंगात पंखाही नाही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंचकुला (चंदिगड) - बाबा राम रहीमच्या जवळची आणि मानलेली कन्या हनीप्रीत एकेकाळी लक्झरी लाइफस्टाइल जगत होती, परंतु आता तिला पंचकुलाच्या चंडिमंदिर पोलिस स्टेशनच्या 10 बाय 14च्या बराकीत राहावे लागतेय. तिला फक्त एक कांबळ देण्यात आली आहे. तुरुंगात सुरक्षेच्या कारणावरून पंखाही नाही. बाबासोबत राहणारी हनीप्रीत भाज्या आणि चॉकलेट्स तसेच कॉफीची शौकीन आहे. तुरुंगात आता तिला हे सर्व मिळणार नाही. आता हनीप्रीत बराकीत काय खातेय, कशी राहातेय यावर DivyaMarathi.com ने इन्व्हेस्टिगेशन केली आहे.
- कधीकाळी अनेक भाज्यांसोबतच जेवणाऱ्या हनीप्रीतला आता रोज सकाळी 7 वाजता चहा दिला जातोय. त्यानंतर सकाळी 11 वाजता नाष्टा मग डिनर. पहिल्या दिवशी मंगळवारी (3 ऑक्टोबर) रोजी रात्री तिला जेवण देण्यात आले होते. यात तिला दोन चपात्या अन् एक वाटी वरण देण्यात आले होते. याप्रमाणेच बुधवारी सकाळी 7 वाजता आणि मग 9 वाजता चहा देण्यात आला. रात्रीच्या जेवणात 3 चपात्या आणि वरण होते.
- हनीप्रीतने अनेकदा कॉफीची मागणी केलेली आहे, कारण हनीप्रीत रुटीनमध्ये कॉफी घेत असे, परंतु येथे फक्त चहाच दिला जातो.
 
एका कांबळ्यात काढली रात्र
- हनीप्रीत नेहमी फाइव्ह स्टार हॉटेल्समध्ये राहिली. येथे तिला ज्या बराकीत ठेवण्यात आले होते, त्यात सुरक्षेच्या कारणावरून कोणताही पंखा नव्हता. बराक 10/14 मध्ये बनलेली आहे आणि त्यात तिचा पूर्ण वेळ जात होता. बराकीत फक्त एक ब्लॅक कलरचे कांबळे आहे, ज्याची लांबी 5/2 आहे. हे एकतर खाली अंथरले जाऊ शकते किंवा पांघरले जाऊ शकते.
 
पेस्ट आणि टूथब्रश मागवले
- सुखदीपने पोलिसांना सांगितले की, हनीप्रीतला मायग्रेनचा त्रास आहे. तिला डॉक्टरांनी चांगल्या क्वालिटीचे तक्के घ्यायला सांगितलेले आहे. परंतु जेलमध्ये असे काहीच नाही. हनीप्रीतने मागच्या चार दिवसांत चार वेळा कपडे बदलले आहेत आणि आता तिच्यासाठी बाहेरून पेस्ट आणि टूथब्रश मागवण्यात आले. हनीप्रीतच्या बॅगमध्ये पूर्वीपासूनच या वस्तू होत्या.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी फोटोज... 
बातम्या आणखी आहेत...