आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

या महिलेने केली हनीप्रीतची मदत, अनेक दिवस ठेवले या ठिकाणी, पोलिसांना मिळाली माहिती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हनीप्रीतची चौकशी करताना पोलिस. - Divya Marathi
हनीप्रीतची चौकशी करताना पोलिस.
चंदीगड- डेऱ्यातीलच महिलेनेच हनीप्रीतला लपून राहण्यासाठी मदत केल्याचे आता समोर आले आहे. अनेक दिवस हनीप्रीतला कुठे लपवून ठेवण्यात आले होते याचीही माहिती आला पोलिसांना मिळाली आहे. हनीप्रीतला भठिंडा येथे या महिलेने लपवून ठेवले होते. तिला लपवून ठेवणाऱ्या महिलेचे नाव सांगण्यास पोलिसांनी सुरवातीला नकार दिला होता.
 
कोण आहे ही महिला, काय आहे नाव
पंचकूलाचे पोलिस आयुक्त  ए. एस. चावला म्हणाले की, या महिलेचे नाव सुखदीप आहे. ती डेऱ्याची समर्थक असून तिच्या घरात हनीप्रीत लपली होती.  डेरा प्रमुख राम रहीमला 25 ऑगस्ट रोजी बलात्काराच्या प्रकरणात दोषी ठरवत सजा सुनावण्यात आली आहे. त्यावेळी हनीप्रीत त्याच्या सोबत हॅलिकॉप्टरमधुन रोहतक येथे गेली होती. मात्र त्यानंतर ती फरार झाली. 39 दिवसानंतर हनीप्रीत पहिल्यादाच मंगळवारी माध्यमांसमोर आली. तिच्यावर देशद्रोहाचा आरोप आहे. दरम्यान पोलिसांनी तिला आसरा देणाऱ्यावरही कारवाई करणार असल्याचे म्हटले आहे. 
 
पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती
बातम्या आणखी आहेत...