पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे देतेय हनीप्रीत
- पोलिस कमिशनर म्हणाले, की ती प्रश्न विचारल्यावर उडवाउडवीची उत्तरे देत आहे. हनीप्रीतला दिल्लीपर्यंत पोहोचवणाऱ्या व्यक्तीने पोलिसांना सांगितले की, हनीप्रीतच्या मोबाइल नंबरबाबत मला माहिती नाही, तो सुखदीप कौरच्या कॉलवर आला होता.
हनीप्रीतने चौकशीत सांगितले- हो, माझा प्लॅन जरूर होता, पण... (गप्प झाली)
पोलिस - डेऱ्याच्या लोकांना पंचकुला येथे बोलावले, किती लोकांना बोलवण्याचे टारगेट होते?
हनीप्रीत - आम्ही खालच्या लोकांना सांगितले होते, येथे केसमधून सुटल्यानंतर सत्संग करण्याचा विचार होता. हा माझा प्लॅन जरूर होता, पण... (गप्प बसली)
पोलिस : किती लोकांना स्वत: सांगितले की, पंचकुलामध्ये हे प्लॅन केले आहे?
हनीप्रीत : (अगोदर गप्प होती, मग बोलली) लोकांना तर येथे यायचेच होते.
पोलिस : कोणत्या नंबर्सचा वापर केला?
हनीप्रीत : माझ्याकडे जे नंबर पहिल्यापासून होते तेच. यानंतर माझा फोन खराब झाला आणि एक नंबर बंद झाला.
पोलिस : आदित्यशी शेवटची कधी भेटली?
हनीप्रीत : लक्षात नाही केव्हा, काही आठवत नाहीये.
दुसऱ्या प्रश्नांवर उत्तरे
प्रश्न : तुझे दुसरे मोबाइल कुठे आहेत?
- कोणते दुसरे... ते तर माझ्याकडून पडले, कुठे ते लक्षात नाही.
प्रश्न: कोण-कोण असायच्या दुसऱ्या गाडीत?
- कोण-कोण असायचे हे माहिती नाही, नावे लक्षात नाहीत.
आमनेसामने: साक्षीदार राकेश आणि हनीप्रीत...
- हनीप्रीत पोलिसांच्या प्रश्नांना उत्तरे देत नाहीये. पोलिसांनी शुक्रवारी दुसरी पद्धत अवलंबिली. तिच्या समोरच दोन साक्षीदार सुखदीप आणि राकेशला बसवून प्रश्नोत्तरे केली. तथापि, याचा काही खास फायदा झाला नाही.
दंगा भडकावण्याच्या मीटिंगवर प्रश्न
साक्षीदार राकेश- हो, 17 ऑगस्टला झालेल्या मीटिंगमध्ये हनीप्रीत उपस्थित होती. समर्थकांनी पंचकुलात यावे असे हीच म्हणाली होती. सर्व लोक अगोदर डेरा प्रमुखाच्या ताफ्यासोबत 28 ऑगस्टला पंचकुलाला जाणार होते. तेव्हा हनीप्रीतने म्हटले की, उशिरा गेलो तर कसे मॅनेज होईल. यासाठी मोठ्या संख्येने समर्थक अगोदर पोहोचले होते.