आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राम रहीमची खास हनीप्रीत नेपाळला पळाली; उदयपुरातून अटक झालेल्या डेरा सदस्याचा जबाब

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंचकुला - बलात्कारी राम रहीमची खास हनीप्रीत नेपाळमध्ये पळून गेली आहे. उदयपूरहून अटक करण्यात आलेल्या डेरा मेंबर प्रदीप गोयल उर्फ विक्कीने हा दावा केला आहे. काही दिवसांपूर्वीच पोलिसांना प्रदीपसह हनीप्रीतची लोकेशन उदयपूरच्या एका मॉलमध्ये आढळली होती. याआधारे पोलिसांनी प्रदीपचा माग काढला. तथापि, दोन साध्वींवरील बलात्कार प्रकरणात राम रहीमला 20 वर्षांची शिक्षा झालेली आहे. शिक्षेच्या सुनावणीवेळी हनीप्रीत त्याच्यासोबतच होती, बाबासह ती तुरुंगापर्यंत हेलिकॉप्टरमध्ये बसून आली होती. तेथून परतल्यानंतर हनीप्रीतचा ठावठिकाणा लागला नाही. हनीप्रीतवर बाबाला पळून जाण्याचा कट रचणे आणि दंगे घडवून आणण्याचा कट रचल्याचा आरोप आहे.
  
राम रहीमच्या आदेशावरून प्रदीप उदयपुरात राहत होता...
- पोलिस सूत्रांनुसार, प्रदीप गोयल हरियाणाचाच राहणारा आहे, परंतु राम रहीमच्या आदेशावरून तो उदयपूरमध्ये राहत होता. चौकशीसाठी त्याला पोलिसांनी पंचकुला नेले आहे.
- हरियाणा पोलिसांना माहिती मिळाली होती की, हनीप्रीत मागच्या अनेक दिवसांपासून उदयपुरात राहत आहे. तेथील सेलेब्रेशन मॉलमध्ये प्रदीपसह तिची लोकेशनही ट्रेस झाली होती.
- याआधारेच तिथे पोलिस गेले, परंतु हनीप्रीत आढळली नाही, प्रदीप मात्र अलगद जाळ्यात अडकला. त्याने सांगितले की, हनीप्रीत नेपाळमध्ये पळून गेली आहे.
  
प्रदीपच्या मोबाइलमधून मिळतील महत्त्वाचे धागेदारे...
- पोलिसांनी प्रदीपचा मोबाइल जप्त केला आहे. ज्यात राम रहीम आणि हनीप्रीतशी निगडित महत्त्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता आहे.
- सूत्रांनुसार, राम रहीमवरील शिक्षेच्या सुनावणीच्या दिवशी राजस्थानहून 15 ते 20 बसेस भरून पंचकुलामध्ये माणसे जमली होती. यातील 2 बसेस उदयपुरातून आल्या होत्या.
- प्रदीप उदयपुरात राम रहीमच्या भक्तांचे नेटवर्क पाहायचा. राजस्थानातून बसेस नेण्याची जबाबदारी त्याच्याच खांद्यावर होती. 
- प्रदीप मोठी गर्दी जमवण्यासाठी आदिवासी भागांना आमिष दाखवले होते, म्हटले होते की, बाबाच्या डेऱ्यात गेल्यावर प्रत्येकाला 25 हजार देण्यात येतील. दंगा भडकावण्यासाठी 2 वा 3 दिवस आधीच या बसेस हरियाणासाठी रवाना झाल्या होत्या.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी फोटोज...
बातम्या आणखी आहेत...