आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हनीप्रीतचे तिसरे नाव आले समोर; बनावट नावाने ऑपरेट करते फेकबुक अकाउंट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंचकूला- बलात्कारी बाबा अर्थात गुरमीत राम रहीमची दत्तक कन्या हनीप्रीतचे तिसरे नाव समोर आले आहे. हनीप्रीत या तिसर्‍या नावाने फेसबुक अकाउंट ऑपरेट करत असल्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. दरम्यान, हनीप्रीतचे खरे नाव प्रियांका तनेजा असे आहे. गुरमीतने तिला दत्तक घेतल्यानंतर  हनीप्रीत हे नाव दिले होते.

समोर आले तिसरे नाव
हनीप्रीतचे आणखी एक नाव 'गुरलीन इन्सान' समोर आले आहे. या नावावर हनीप्रीतने एक मोबाईल सीम खरेदी केले आहे. हरियाणा पोलिसांची एसआयटी हनीप्रीतच्या तिसर्‍या नावाबाबत अधिक चौकशी करत आहे.

इंडियन फिल्म अॅण्ड टेलीव्हिजन डायरेक्टर्स असोसिएशन (आयएफटीडीए) मुंबईने हनीप्रीतचे सदस्यत्त्व  रद्द केल्याच्या सर्टिफिकेटवर हनीप्रीतचा एक मोबाइल क्रमांक आहे. त्यात क्रमांकाने ती फेसबुक अकाउंट ऑपरेट करत होती, अशी माहिती समोर आली आहे.

गुरलीन इन्सान नावाने फेसबुक अकाउंट
हनीप्रीतने याच मोबाइल क्रमाकांने गुरलीन इन्सान नावाने फेसबुक आयडी बनवला होता. आयडीअवरील सर्व डेटा काही दिवसांपूर्वी डिलीट करण्‍यात आला होता. हा क्रमांक ट्रू कॉलरवर तपासला असता जीआय, पानीपत असे ‍स्क्रीनवर दिसते.

सायबर एक्सपर्ट्सनुसार, हनीप्रीत या क्रमांकावरून नाम बदलून फेसबुक अकाउंट ऑपरेट करत असेल. तसेच हनीप्रीतचा हा क्रमांक कोणी जीआय  या नावाने सेव केला असेल.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... सोशल मीडियावर व्हायरल होणारे हनीप्रीतचे फोटो...
बातम्या आणखी आहेत...