आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

HONOUR KILLING: सासर-माहेरच्या नातेवाइकांनी केली प्रेमीयुगुलाची हत्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पानीपत/फतेहाबाद- हरियाणातील फतेहाबादमध्ये ऑनर किलिंगची घटना उघडकीस आली आहे. 32 वर्षीय विवाहीत महिला आणि तिचा 22 वर्षीय प्रियकराची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. मृत महिलेच्या सासर आणि माहेरच्या नातेवाइकांनी हे दुहेरी हत्याकांड केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. दोन्ही कुटुंबियांनी प्रेमीयुगुलाची पाण्याच्या टाकीत बुडवून निर्घृण हत्या केली. एवढेच नव्हे तर दोघांचे मृतदेह एका कालव्यात फेकून दिले.

प्रेमीयुगुल करणार होते विवाह
फतेहाबादमधील जांडला कला गावात ही घटना घटली आहे. मृत युवकाचे नाव विश्वजीत असून त्याचे गावातील एक विवाहित महिलेसोबत प्रेमसंबंध होते. प्रेमीयुगुल 11 जुलैला विवाह करणार असल्याची माहिती मिळाली आहे. दोघे मे महिन्यात गावातून पळून गेले होते. महिलेच्या सासरच्या मंडळीने विश्वजितविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली होती. महिलेला त्याने पळवून नेल्याचे तक्रारीत म्हटले होते.

दुसरीकडे, विश्वज‍ितच्या आईनेही तो बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसात दाखल केली होती. याप्रकरणी पोलिसांनी मंगळवारी पाच जणांना ताब्यात घेतले. प्रेमयुगुल हैदराबादला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी 2 जून, 2015ला दोघांना हैदराबाद येथून ताब्यात घेतले. परंतु, महिला सासरी जाण्यास तयार नव्हती. त‍िला विश्वजितसोबत विवाह करायचा होता. आपण स्वखुशीने विश्वजितसोबत आल्याचाही जबाब तिने कोर्टात दिला. यामुळे कोर्टने महिलेला करनाल येथील नारी निकेतनमध्ये पाठवले. परंतु महिला नारी निकेतन मधून आणि विश्वचित गावातून अचानक गायब झाले. पोलिसांनी पुन्हा दोघांचा शोध घेतला. परंतु दोघे सापडले नाही. याप्रकरणी महिलेचे सासरचे आणि माहेरच्या नातेवाइकांना चौकशीसाठी बोलवते. पोलिसी खाक्या दाखवताच आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला.
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, संबंधित फोटो...
बातम्या आणखी आहेत...