आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Honor Killing Case In Sapphire International School

शिक्षिकेने विद्यार्थ्यांच्या डोक्यात ड्रील मशीनने केले छिद्र, प्रेमाचा संशय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिक्षिका नाजिमा आणि विनय - फाइल फोटो. - Divya Marathi
शिक्षिका नाजिमा आणि विनय - फाइल फोटो.
(शिक्षिका नाजिमा खातून आणि विनय महतो - फाइल फोटो)
रांची (झारखंड) - एका शिक्षिकेने सातवीत शिकणा-या विद्यार्थ्‍याची हत्‍या केल्‍याची धक्‍कादायक घटना रांचीमध्ये घडली आहे. आपल्या मुलीवर प्रेम करतो म्हणून नाजिया हुसेन नावाच्‍या शिक्षिकेने विद्यार्थ्‍याला ठार मारले. नाजिया रांचीच्या सफायर इंटरनॅशनल स्कूलमध्ये कार्यरत आहे. तर, विनय महतो असे हत्‍या झालेल्‍या 12 वर्षीय मुलाचे नाव आहे. विनयला का ठार मारले ....
विनयला का ठार मारले ....
- विनय महतोला नाजिया यांची मुलगी आवडत होती. मात्र, हे त्‍यांना पटत नव्‍हते.
- शिक्षिकेची मुलगीही त्‍याच्‍याच शाळेत आठव्‍या वर्गात शिकत होती.
- एसएसपी कुलदीप द्विवेदी यांच्‍या माहितीनुसार, विनयची हत्‍या हा ऑनर किलिंगचा प्रकार आहे.
- पोलिसांच्‍या माहितीनुसार, नाजिया आणि कुटुंबियांनी विनयची हत्‍या केल्‍याचे मान्‍य केले आहे.
कशी केली हत्‍या....
- नाजियाचा मुलगा याच शाळेत अकराव्‍या वर्गात शिकतो. सर्व विद्यार्थी येथे वसतिगृहात राहतात.
- 5 फेब्रुवारीला रात्री त्‍याने विनयला फोन करून डान्‍सच्‍या सरावासाठी बोलावले.
- विनय बाहेर पडल्‍यानंतर त्‍याला जबर मारहाण केली. यामध्‍ये त्‍याची शुद्ध हरपली.
- विनयच्‍या डोक्‍यात ड्रिल मशीनने छिद्र केले होते, अशी माहितीही समोर आली आहे.
- त्‍याला मृत समजून टीसर्च वसतिगृहाच्‍या पहिल्‍या मजल्‍यावरून खाली फेकण्‍यात आले.
- 6 फेब्रुवारीला विनयचा मृतदेह आढळला. त्‍यानंतर राचीमध्‍ये तणावाचे वातावरण निर्माण झाले.
शवविच्‍छेदनाच्‍या रिपोर्टमधून समोर आली क्रुरता....
- पीएम रिपोर्टमध्‍ये म्‍हटले की, विनयला मारहाण केल्‍याची त्‍याचा मृत्‍यू झाला आहे.
- त्‍याला एवढ्या निर्दयपणे मारहाण केली की, त्‍याचे यकृत फुटले.
- त्‍याचा एक डोळा निघाला होता. डोक्‍यात छिद्र होते. दातही तुटले होते.
पोलिस कारवाई....
- हत्‍येच्‍या आरोपात शिक्षिका नाजिया, पती आणि दोन मुलांना बुधवारी अटक करण्‍यात आली.
- पोलिसांनी चौकशीसाठी शाळेतील तीन शिक्षकांना ताब्‍यात घेतले आहे.
- विनयच्‍या वडिलांना याबाबत शाळेने फोनवर माहिती दिली.
- आधी तो आजारी असल्‍याचे सांगितले. नंतर त्‍याचा अपघात झाल्‍याची माहिती वडिलांना दिली.
- वसतिगृहाच्‍या CCTV मध्‍ये विनय ठिक असल्‍याचे आढळले.
- विनयची आई म्‍हणाली, घटनेच्‍या रात्री 1 वाजता त्‍या विनयसोबत बोलल्‍या होत्‍या. तो ठिक होता.
पुढील स्‍लाइड्समध्‍ये पाहा, याच ठिकाणी सापडला होता विनयचा मृतदेह... शिक्षिकेच्या खोलीत सर्वत्र लिहिले आहे फेल... आणखी बरेच काही....
(फोटो : संदीप नाग.)