आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑनर किलिंग : आधी नवरीसारखे सजवले, नंतर पित्यानेच खून करून ब्यास नदीत फेकले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र - प्रतिकात्मक
बटाला - गावातील मुलाबरोबरच मुलीने प्रेमसंबंध प्रस्थापित केल्याच्या रागात कुटुंबीयांनीच मुलीचा खून करून तिचा मृतदेह ब्यास नदीत फेकून दिल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी मुलीचे वडील, काका आणि मामासह पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

श्रीहरगोविंदपूर गावातील किडी अफगानाचे राहणारे समशेर सिंह उर्फ शेरा यांनी पोलिसांना सांगितले की, त्याचे शेजारी राहणा-या परमजीत कौरबरोबर हिच्याबरोबर प्रेमसंबंध होते. परमजीतच्या कुटुंबीयांचा मात्र त्याला विरोध होता. पण परमजीतला तिच्याबरोबरच लग्न करायचे होते.
30 सप्टेंबरला परमजीतने रात्री फोनवर शेराला सांगितले की, तिच्या कुटुंबीयांनी लग्नासाठी होकार दिला आहे. मात्र लग्न गावकर-यांच्या लपून तिचे मामा जगतार सिंह यांच्या बेटपत्तन गावात करण्याचे ठरले असल्याचेही तिने सांगितले. परमजीतने त्यालाही त्याठिकाणी बोलावले. शेराने सांगितले की, तो रात्री सुमारे 11 वाजता परमजीत कौरने सांगितलेल्या ठिकाणी जात होता. त्यावेळी त्याने परमजीत नवरीच्या वेशात असून तिचे कुटुंबीय तिला नदीकडे घेऊन जात असल्याचे पाहिले.
धोका लक्षात घेता आपण परत आल्याचे शेरा म्हणाला. त्यानंतर परमजीत कौरनेही शेराला परत फोन केला नाही. दुस-या दिवशी परमजीत कौरचा नवरीच्या पोशाखातील मृतदेह ब्यास नदीच्या किना-यावर झुडपामध्ये सापडला. एसएसपी मनमिंदर सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार ऑनर किलिंग प्रकरणी मुलीचे वडील लखबीर सिंह, मामा जगतार सिंह यांच्यासह पाच जणांच्या विरोधात हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.