आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑनर किलिंग: शिक्षिकेचा पती मुलींना पाठवायचा अश्‍लिल MMS, परिवाराला अटक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
( आरोपी शिक्षिका आणि परिवार - फाइल फोटो)
रांची (झारखंड) - मुलीवर प्रेम करत असल्‍याच्‍या संशयावरून एका शिक्षिकेने सातवीत शिकणा-या विद्यार्थ्‍याची हत्‍या केल्‍याची धक्‍कादायक घटना रांचीमध्ये घडली. नाजिया हुसेन असे या शिक्षिकेचे नाव असून ती सफायर इंटरनॅशनल स्कूलमध्ये कार्यरत आहे. तर, विनय महतो असे हत्‍या झालेल्‍या 12 वर्षीय मुलाचे नाव आहे. नाजियाचा पती आरिफबाबतही धक्‍कादायक माहिती समोर आली आहे. विद्यार्थिनींना अश्‍लिल MMS पाठवण्‍याच्‍या आरोपात शाळेने त्‍याला काढले आहे. प्रेमाच्‍या संशयातून विनयची क्रुर हत्‍या....
प्रेमाच्‍या संशयातून विनयची क्रुर हत्‍या....
- विनय महतोला नाजिया यांची मुलगी आवडत होती. मात्र, हे त्‍यांना आवडत नव्‍हते.
- शिक्षिकेची मुलगीही त्‍याच्‍याच शाळेत आठव्‍या वर्गात शिकत होती.
- एसएसपी कुलदीप द्विवेदी यांच्‍या माहितीनुसार, विनयची हत्‍या हा ऑनर किलिंगचा प्रकार आहे.
- पोलिसांच्‍या माहितीनुसार, नाजिया आणि कुटुंबियांनी विनयची हत्‍या केल्‍याचे मान्‍य केले आहे.
मुलींना अश्‍लिल MMS पाठवण्‍याच्‍या आरोपात शाळेने आरिफला काढले....
- मुलीच्‍या प्रियकराच्‍या हत्‍येत सहभागी असलेला नाजियाचा पती आरिफ सफायर स्कुलमध्‍ये गणित शिकवत होता.
- त्‍याला शाळा व्‍यवस्‍थापनाने चार महिन्‍यांपूर्वी काढून टाकले.
- त्‍याच्‍यावर विद्यार्थिनींना अश्‍लिल MMS पाठवण्‍याचा आरोप होता.
- विद्यार्थिनींच्‍या छळासह तो परीक्षेचे पेपर विकत असल्‍याचा आरोपही त्‍याच्‍यावर ठेवण्‍यात आला होता.
- नंतर आरिफने टॉरियन वर्ल्ड स्कुलमध्‍ये नोकरी मिळवली.
- त्‍याची पत्नी नाजिया सफायरमध्‍ये हिंदी शिकवते.
पोलिस कसे पोहोचले आरोपीपर्यंत....
- पोलिसांनी शाळेच्‍या कॅम्‍पसमध्‍ये शिक्षकांना विनयचे पाच चांगले गुण आणि पाच उणिवा विचारल्‍या.
- दरम्‍यान विनयची नाजिया हुसैन यांच्‍या मुलीसोबत मैत्री होती असे लक्षात आले.
- हत्‍येच्‍या तीन दिवसानंतर पोलिसांनी स्निफर डॉगला कामाला लावले. तो विनयच्‍या घरापासून निघाला नि नाजिया यांच्‍या रूमजवळ पोहोचला.
- फॉरेंसिक सायन्‍स टीमने या केससंदर्भातील सर्व पुरावे गोळा केले.
डान्‍सच्‍या सरावासाठी बोलावून मारहाण...
या शाळेतील विद्यार्थी वसतिगृहात राहतात. नाजियाचा मुलगा येथेच अकराव्‍या वर्गात शिकतो. 5 फेब्रुवारीला रात्री त्‍याने विनयला फोन करून डान्‍सच्‍या सरावासाठी बोलावले. विनय बाहेर पडल्‍यानंतर त्‍याला जबर मारहाण केली. यामध्‍ये त्‍याची शुद्ध हरपली. विनयच्‍या डोक्‍यात ड्रिल मशीनने छिद्र केले होते, अशी माहितीही शवविच्‍छेदनात समोर आली आहे. 6 फेब्रुवारीला विनयचा मृतदेह आढळला. त्‍यानंतर राचीमध्‍ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
शवविच्‍छेदनाच्‍या रिपोर्टमधून समोर आली क्रुरता....
- पीएम रिपोर्टमध्‍ये म्‍हटले की, विनयला मारहाण केल्‍याची त्‍याचा मृत्‍यू झाला आहे.
- त्‍याला एवढ्या निर्दयपणे मारहाण केली की, त्‍याचे यकृत फुटले.
- त्‍याचा एक डोळा निघाला होता. डोक्‍यात छिद्र होते. दातही तुटले होते.
- हत्‍येच्‍या आरोपात शिक्षिका नाजिया, पती आणि दोन मुलांना बुधवारी अटक करण्‍यात आली.
- विनयच्‍या वडिलांना याबाबत शाळेने फोनवर माहिती दिली.
- आधी तो आजारी असल्‍याचे सांगितले. नंतर त्‍याचा अपघात झाल्‍याची माहिती वडिलांना दिली.
- वसतिगृहाच्‍या CCTV मध्‍ये विनय ठिक असल्‍याचे आढळले.
- विनयची आई म्‍हणाली, घटनेच्‍या रात्री 1 वाजता त्‍या विनयसोबत बोलल्‍या होत्‍या. तो ठिक होता.
पुढील स्‍लाइड्समध्‍ये पाहा, येथे सापडला विनयचा मृतदेह व इतर फोटो....