आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • HONOR KILLING News In Marathi, Hyderabad, Software Engineer

HONOR KILLING: वडीलांनी केली सॉफ्टवेअर इंजिनियर मुलीची हत्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हैदराबाद- प्रेमविवाह केल्याने संतप्त झालेल्या आई-वडीलांनी मुलीची हत्या केल्याचे प्रकरण उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. 25 वर्षांची ही मुलगी सॉफ्टवेअर इंजिनिअर होती. या मुलीने दुसऱ्या जातीतील मुलाशी प्रेमविवाह केला होता. त्यावर तिचे आई-वडील समाधानी नव्हते. त्यामुळे वडीलांनी दुपट्ट्याच्या मदतीने मुलीची गळा आवळून हत्या केली. या कामात मुलीच्या आईने त्यांना मदत केली. या प्रकरणी पोलिसांनी मुलीच्या आई-वडीलांना अटक केली आहे.
मुलगी सॉफ्टवेअर इंजिनिअर होती
हैदराबादमधील एचसीएल या सॉफ्टवेअर कंपनीत मुलगी नोकरीला होती. तिच्या कार्यालयात काम करीत असलेल्या एका मुलासोबत तिचे अफेअर होते. याबाबत तिचे आई-वडील समाधानी नव्हते. आई-वडीलांचा विरोध झुगारून मुलीने शुक्रवारी आर्य समाज मंदिरात मुलासोबत लग्न केले. या लग्नासाठी तिने आई-वडीलांना बोलविले होते. परंतु, ते आले नाहीत.
पुढे वाचा, खोटे बोलून बोलविले होते घरी...