आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Honour Killing In Bhind Near Gwalior Madhya Pradesh

HONOUR KILLING : स्वतःचा प्रेमविवाह, बहिणीची मात्र प्रियकरासह केली हत्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(आरोपी प्रमोद पाराशर, यानेच बहिणीचे आणि तिच्या प्रियकराच्या हत्येची सुपारी दिली.)

(ग्वाल्हेर) भिंड - मध्य प्रदेशच्या भिंड येथे एका भावाने बदनामी टाळण्यासाठी बहीण आणि तिच्या प्रियकराची हत्या केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी शंका येऊ नये यासाठी त्याने प्रियकरावरच बहिणीच्या हत्येचा आरोपही लावला. हा प्रकार शहराच्या अटेर रोडवरील मातादीनच्या पुरा परिसरात 23 जून रोजी घडला. विशेष म्हणजे या प्रकरणातील आरोपी म्हणजे भावाने स्वतः मात्र प्रेमविवाह केला होता.
पोलिसांनी प्रकरणाच्या सखोल चौकशीनंतर यासंदर्भात खुलासा केला. आरोपी प्रमोद आणि त्याचे दोन साथीदार रामसिया शर्मा व वीरेंद्र शर्मा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून तिघांना अटक करण्यात आली आहे.
भावाबरोबर राहणा-या पुजाची (वय 16 वर्षे) 23 जून रोजी सकाळी सुमारे सहाच्या सुमारास चार गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. मुरैना येथील प्रमोश पाराशर यांनी घटनेच्या दिवशी पोलिसांना आपल्या घरासमोर राहणारे राहुल आणि विपीन ओझा हे आरोपी असल्याचे सांगितले होते. हे दोघे सख्खे भाऊ आहेत. त्यांच्यामध्ये जमीनीवरून वाद होता. त्यांनीच पुजाची हत्या केल्याचे सांगितले. पोलिसांनी या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता.
तपासात पोलिसांना शंका आल्याने त्यांनी प्रमोदचीही चौकशी केल्याचे एसपी डॉ. आशीष यांनी सांगितले. चौकशीत पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्हा मान्य केला. त्याने सांगितले की, राहुल आणि पुजा यांच्यात प्रेमसंबंध होते. 21 जून रोजी सायकाळी फोन करून त्याने राहुलला मेहगाव येथे बोलावले. एटीएममध्ये चोरी करायचा बहाणा करून त्याने राहुलची त्याचे मित्र रामसिया व वीरेंद्र यांच्याशी भेट घालून दिली.

सगळे एका हॉटेलात बसून दारू प्यायले त्यानंतर मद्यधुंद अवस्थेत असलेल्या राहुलला गोळी घातली. रात्रीच त्याला औरेयाच्या अजीतमल येथे मुरादगंजजवळच्या एका कालव्यात फेकून दिले. दुस-या दिवशी सकाळी सहा वाजता प्रमोदचे मित्र त्याच्या घरी आले व त्यांनी पुजाचीही हत्या केली.

पुढे वाचा - 24 तासांत बोलणे झाले नाही तर समजून घ्यायचे की, जगाचा निरोप घेतला