आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आईच्या अंत्यविधीची तयारी करत होते, कपडा हटवताच दिसला अनोळखी पुरुषाचा मृतदेह

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुडगाव - येथील एक शोकाकुल परिवार आपल्या घरातील 50 वर्षीय महिलेच्या अंत्यसंस्काराची तयारी करत होता. रुग्णालयातून आणलेला तिचा मृतदेह उघडताच कुटुंबीय चक्रावले. हॉस्पिटलने त्यांना महिलेच्या मृतदेहाऐवजी चक्क पुरुषाची बॉडी पाठवली होती. कुटुंबियांनी हॉस्पिटलला फोन केल्यानंतर त्यांनी ती चूक मान्य केली. विशेष म्हणजे, रुग्णालय प्रशासनाला ही घोडचूक कळाली तेव्हा रुग्णवाहिकेचा ड्रायव्हर 100 किमी दूर निघाला होता. 

 

> उत्तर प्रदेशच्या कासगंज येथे राहणाऱ्या मंगो देवी (50) यांच्या डोक्याला 10 दिवसांपूर्वी गंभीर दुखापत झाली होती. त्यांना ईएसआय रुगण्लाय सेक्टर-9 मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. 20 नोव्हेंबर रोजी ईएसआय हॉस्पिटलने त्यांना गुडगाव येथील रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. त्याच ठिकाणी रात्री मंगो देवी यांचे निधन झाले.
> मृत्यू झाला त्यावेळी 30 वर्षीय मुलगा सोबतच होता. रात्री सुमारे 1 च्या सुमारास हॉस्पिटलने मुलाला मृतदेह सुपूर्द केला आणि जाण्यास सांगितले. याचवेळी हॉस्पिटल प्रशासनाने निष्काळजीपणे महिलेचा मृतदेह देण्याऐवजी 40 वर्षीय पुरुषाचा मृतदेह कुटुंबियांना गुंडाळून दिला. 
> दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता रुग्णवाहिकेचा चालक कासगंज येथे बॉडी पोहोचवून परतीच्या प्रवासासाठी निघाला. घरातील सगळेच अंत्यविधीच्या तयारीला लागले होते. कुटुंबातील एकाने मृतदेहावरील कपडा हटवल्यानंतर ती बॉडी मंगो देवी यांची नसल्याचे कळाले. यानंतर रुग्णालयाने संबंधित महिलेचा मृतदेह दुसऱ्या अॅम्बुसेन्समध्ये कासगंजला रवाना केला. 

बातम्या आणखी आहेत...