आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चहाला राष्ट्रीय पेय जाहीर करण्याची मागणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
किसानगंज - चहा या पेयाची अर्थव्यवस्थेतील प्रभावी भूमिका आणि आरोग्यविषयक महत्त्व लक्षात घेता हे राष्ट्रीय पेय म्हणून जाहीर करण्याची मागणी आघाडीवरील चहा उत्पादकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली आहे. उत्तर बंगाल आणि बिहारमधील चहाची पाने खरेदी करणा-या १०० कारखान्यांचे नेतृत्व करणा-या उत्तर बंगाल टी प्रोड्युसर्स वेलफेअर असोसिएशनकडून पंतप्रधानांना या मागणीसाठी एक पत्र पाठवण्यात आले आहे. या कारखान्यांमध्ये १०० दशलक्ष किलोहून अधिक चहाचे उत्पादन होते.

राष्ट्रीय मान का द्यायचा?
चहा उत्पादकांनी पंतप्रधानांकडे दिलेल्या पत्रात चहाला राष्ट्रीय पेयाचा मान का द्यायचा, याची कारणे नमूद केली आहेत. ती पुढीलप्रमाणे आहेत. अर्थ तसेच आरोग्य क्षेत्रात चहाची महत्त्वाची भूमिका आहे.

भारतात १,२०० दशलक्ष किलो चहाचे उत्पादन होते. त्यापैकी ९०० दशलक्ष किलो चहा भारतातच वापरला जातो. चहानिर्मिती ही पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने होत असून यात कोणत्याही विदेशी घटकाचा समावेश नसतो. अँटी ऑक्सिडंट्स असल्यामुळे चहा इतर पेयांच्या तुलनेत आरोग्यदायी पेय आहे. रेल्वे आणि सुरक्षा क्षेत्रानंतर चहा उत्पादन क्षेत्रात सर्वाधिक रोजगार आहेत.

किसानगंज चहासाठी प्रसिद्ध : बिहारमधील किसानगंज हा चहा उत्पादनात सर्वात अग्रेसर परिसर असून जिल्ह्यातील २५,००० एकर जमिनीवर चहाचे पीक घेतले जाते.