आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जर्मन तरुणीवर बलात्काराचा प्रयत्न; व्हिडिओ करणारा हॉटेल व्यवस्थापक अटकेत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आग्रा- 'ताजनगरी'त पुन्हा एकदा विदेशी तरुणीवर बलात्काराचा प्रयत्न झाल्याची घटना उघडकीस आली. आग्रा येथे पर्यटनासाठी आलेली जर्मन तरुणी 'हॉटेल रिलॅक्स'मध्ये थांबली होती. ती एकटी असल्याचे पाहून सोमवारी पहाटे हॉटेल व्यवस्थापकाने तिच्या खोलीत बेकायदा प्रवेश करून तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. तरुणीचा 'एमएमएस' करण्याचा त्याचा इरादा होता. परंतु, पीडित तरुणीने प्रसंगावधान राखून त्याच्या तावडीतून स्वत:ची सूटका करून घेतली.

ही बाब रात्री गस्त घालणार्‍या पोलिसांच्या निदर्शनास आली. पोलिसांनी पीडित तरुणीची चौकशी केल्यानंतर तिने झालेला सगळा प्रकार पोलिसांना सांगितला. पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेवून हॉटेल रिलॅक्सवर छापेमारी करून आरोपी हॉटेल व्यवस्थापक हरिओम यास अटक केली. आरोपी ताजगंजमधील गोबरचौकी येथील रहिवासी आहे.

हरिओम विरोधात भादंवि 354, 354 अ, 354 बी, 354 सी व 354 डी या कलमांखाली गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आरोपीवरील आरोप सिद्ध झाल्यास त्याला दोन वर्षांचा तुरुंगवास व अथवा दंडात्मक कारवाई होऊ शकते.

पुढील स्लाईड्‍सवर वाचा, यापूर्वीही झाला आहे विदेशी तरुणीवर बलात्काराचा प्रयत्न...