हैदराबाद - जहरी वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या एमआयएमचे नेते खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी आणखी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. अटलबिहारी वाजपेयी यांना भारतरत्न आणि लालकृष्ण अडवाणी यांना पद्मविभूषण पुरस्कार देऊन सरकारने मारेक-यांना गौरवले असल्याची टीका ओवेसी यांनी केली आहे. हैदराबादेतील एका कार्यक्रमात त्यांनी ही टीका केली आहे.
अशा प्रकारे मारेक-यांना पुरस्कार देत असेल तर सरकारवर विश्वास कसा ठेवायचा असे ओवेसी यांनी म्हटले आहे. बाबरी प्रकरणावरून ओवेसी यांनी वाजपेयी यांच्या नावावर आक्षेप घेतला आहे. बाबरी प्रकरणात अटलबिहारी वाजपेयी यांच्या भूमिकेबाबतही ओवेसी यांनी शंका उपस्थित केली आहे. वाजपेयी यांना थेट मारेकरी संबोधल्याने आता भाजपची या वक्तव्यावर आता कशी प्रतिक्रिया उमटते याकडे सगळ्यांचेच लक्ष असेल.