आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

"चार बोतल व्होडका'ला राेखायचे कसे, हायकोर्टाने केंद्र सरकारला विचारला मार्ग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - "चार बोतल व्होडका'सारख्या मादक पदार्थ व दारूच्या वापराला प्रोत्साहन देणाऱ्या चित्रपट गीतांना रोखण्यासाठी काही मार्ग अाहे का, अशी विचारणा बुधवारी दिल्ली हायकोर्टाने माहिती व प्रसारण मंत्रालयाला केली.
तत्पूर्वी, मंत्रालयाने कोर्टाला सांगितले की, या गाण्यांना सेन्सॉरच्या मंजुरीनंतर आम्हाला अधिकार नसतो. त्यावर कोर्ट म्हणाले, चित्रपटांत अशी गाणी दाखवणे ही चिंतेची बाब असून त्यावर विचार करण्याची गरज आहे. अशा गाण्यांना रोखण्यासाठी काही मार्ग आहे का, असे कोर्टाने विचारले. विजय दहिया व अंकुरकुमार मिश्रा यांच्या याचिकेत "चार बोतल व्होडका' व "मैं अल्कोहोलिक हूं' अशा गाण्यांवर बंदीची मागणी आहे.
बातम्या आणखी आहेत...