आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाळाला जन्‍म देण्‍यापूर्वी 30 तास तडफत होती मुमताज, अशी होती ती मृत्‍यूची रात्र

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
2005 मध्‍ये शाहजहान आणि मुमताजच्‍या लव स्टोरीवर आलेल्‍या चित्रपटात लीड रोलमध्‍ये जुल्फी सईद आणि सोनिया जेहान होते. - Divya Marathi
2005 मध्‍ये शाहजहान आणि मुमताजच्‍या लव स्टोरीवर आलेल्‍या चित्रपटात लीड रोलमध्‍ये जुल्फी सईद आणि सोनिया जेहान होते.
आग्रा- मुघल बादशाह शाहजहानने ज्‍या मुमताजसाठी ताजमहाल बांधला, तिचा मृत्‍यू अत्‍यंत दु:खदायक होता. 14 व्‍या मुलाच्‍या जन्‍माच्‍या वेळी तिला 30 तास कळा सोसाव्या लागल्‍या. त्‍यानंतर 17 जून 1631 च्‍या सकाळी तिने अखेरचा श्‍वास घेतला. इतिहासकार अब्‍दुल हमीद लाहोर आणि आमिर सालेह यांनी या मार्मिक घटनेबाबत बादशानामामध्‍ये उल्‍लेख केला आहे. फुल टाइम प्रेग्नेंसीमध्‍ये शाहजहानने मुमताजला केले होते मजबूर...
- 'ताजमहल या ममी महल'चे लेखक अफसर अहमद यांनी त्‍यांच्‍या पुस्‍तकात या गंभीर घटनांचा उल्‍लेख केला आहे.
- इतिहासकारांच्‍या माहितीनुसार शाहजहान, मुमताजसोबत खूप प्रेम करत होता.
- मुमताजला सोडून तो दूर जाण्‍यास तयारही नव्‍हता.
- डेक्कनमध्‍ये (दक्षिण भारत) लोदीच्‍या विद्रोहाला थांबवण्‍यासाठी शाहजहानला ब-हानपूरला जायचे होते. तेव्‍हा मुमताज गर्भवती होती.
- मुमताज गर्भवती असतानाही शाहजहानने तिला आग्रा येथून 787 किलोमीटर दूर धौलपूर, ग्‍वाल्‍हेर, मारवाड सिरोंज, हंदियामार्गे ब-हानपूरला नेले होते.
- लांबच्‍या प्रवासामुळे मुमताज प्रचंड अशक्‍त झाली होती. थकली होती. त्‍याचा परिणाम तिच्‍या गर्भावर झाला होता. यामुळेच तिला प्रचंड त्रास सहन करावा लागला.
- 16 जून, 1631 च्‍या रात्री मुमताजला प्रसुतीच्‍या वेळी प्रचंड त्रास होऊ लागला.
शाहजहान आखत होता विद्रोहाविरोधात रणनिती..
- मुमताज प्रसुतीच्‍या वेळी तडफत होती, तर शाहजहान डेक्कनचा विद्रोह थांबवण्‍यासाठी रणनीति आखत होता.
- मुमताज वेदनेने तडफत असल्‍याची माहिती त्‍याला मिळाली होती. तरीही तो मुमताजच्‍या जवळ गेला नाही.
- मुमताज मंगळवारच्‍या सकाळपासून बुधवारच्‍या मध्‍यरात्री पर्यंत त्रास सहन करत होती.
- 30 तासानंतर मुमताजने एका मुलीला जन्‍म दिला. मात्र, तिची प्रकृती अत्‍यंत गंभीर होती.
- दाई आणि हकीम मुमताजचा अत्याधिक रक्तस्राव थांबवू शकले नाही.
- शाहजहानने हरममध्‍ये जाण्‍याचा निर्णय घेतला, तेव्‍हा त्‍याला संदेश मिळाला की, "बेगम ठीक आहे, मात्र, ती खूप थकली आहे. मुलीला जन्‍म दिल्‍यानंतर मुमताजला गाढ झोप लागली."
अखेर शाहजहानला बोलावण्‍यात आले..
- मुमताजची प्रकृती आणखीच बिघडली, मुलगी जहाँ आराला शाहजहानला बोलवण्‍यासाठी पाठवण्‍यात आले.
- शाहजहान हरमला पोहोचला, तेव्हा त्‍याने मुमताजला अत्‍यंत गंभीर परिस्‍थितीत पाहिले.
- बादशहाचा आवाज ऐकूण मुमताजने डोळे उघडले. तिच्‍या डोळ्यात अश्रू दाटले होते.
- शाहजहान मुमताजच्‍या उशाशी बसला होता.
मृत्‍यूपूर्वी शाहजहानकडून घेतले दोन वचनं..
- मुमताजने अखेरच्‍या घटकेला शाहजहानकडून 2 वचनं घेतली होती.
- तिने घेतलेले पहिले वचन हे लग्‍न न करण्‍यासंदर्भात होते.
- दुसरे वचन एक असा मकबरा बनवण्‍यासंदर्भात होता जो आश्‍चर्यकारकर असेल.
- त्‍यानंतर काही वेळानंतर मुमताजने प्राण सोडले.
- मुघल इतिहासकार अब्‍दुल हमीद लाहोरने बादशाहनामामध्‍ये लिहीले की, "राणीचे निधन 40 व्‍या वर्षी झाले. तिला 14 मुलं होती. (8 मुलगे आणि 6 मुली.)
मृत्‍यूनंतर 5 दिवस कापडात होते शव..
- मुमताजची काळजी घेणा-या सती उन निसाने तिचा मृतदेह पाच दिवस कापडात ठेवला होता.
- मुमताजच्‍या मृत्‍यूनंतर केवळ बादशहाच नाही तर पूर्ण ब-हानपूर शोकात होते.
- मुमताजचे शव तापी नदीच्‍या किना-यावर जेनाबागमध्‍ये दफन करण्‍यात आले.
- मृत्‍यूच्‍या 12 वर्षानंतर हे शव आग्रा येथे निर्माणाधीन असलेल्‍या ताजमहलमध्‍ये दफन करण्‍यात आले.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, या सुंदर पण दु:खी Love Story चे Photos...
बातम्या आणखी आहेत...