आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संजय गांधीपासून राहुल पर्यंत, निवडणूक प्रचारात असा राहातो अंदाज, पाहा PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली/लखनऊ - काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आज 46 वर्षांचे होत आहेत. उत्तर प्रदेशातील खासदार असलेल्या राहुल यांच्यासमोर 2017 मध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाला विजयी करण्याचे मोठे आव्हान राहाणार आहे. देशातले सर्वात मोठे राज्य उत्तर प्रदेश कधीकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होते. येथील अमेठी लोकसभा मतदारसंघातून इंदिरा गांधींपासून आता राहुल गांधी संसदेत जात राहिले आहेत. हा असा जिल्हा आहे ज्यासोबत गांधी परिवार 40 वर्षांपासून बांधला गेला आहे.

हेही वाचा... संसदेत झोपण्यापासून चप्पल उचलण्यापर्यंत, हे आहेत राहुल गांधींचे VIRAL PHOTOS

राहुल गांधींच्या वाढदिवसानिमीत्त जाणून घेऊ या अमेठीसोबत गांधी कुटुंबाचे ऋणानूबंध...
>> 70 च्या दशकात अमेठीत आलेले संजय गांधी यांनी येथे विकासाची पायाभरणी स्वतः कुदळ-फावडे हातात घेऊन केली होती.
>> त्यासोबतच गांधी परिवाराची मुळेही त्यांनी येथे रुजवली त्याला आजता गायत कोणीही हात लावू शकलेले नाही.

हेही वाचा...मोदींनी राहुल गांधींना असे केला होते बर्थडे विश, Twitterवर #VishwaPappuDiwas

>> संजय गांधीच्या प्रचारासाठी येथील तरुण टोळी-टोळीने फिरत असायचे.
>> संजय गांधींचा गाड्यांचा ताफा घेऊन फिरण्यावर विश्वास नव्हता. ते अधिकाधिक पदयात्रा काढत आणि लोकांच्या प्रत्यक्ष गाठी भेटी घेत. आपलेपणाने त्यांची विचारपूस करत असयाचे.
>> अमेठी येथील स्थानिक काँग्रेस नेते पारस नाथ यांनी सांगितले, 'त्याकाळत लोक संजय भय्यांसोमर बिनधास्त आपल्या समस्या मांडत. त्यांच्यासमोर आपले मन मोकळे करत होते.'
>> पारस नाथ सांगतात, 'एखाद्या अधिकाऱ्याने अडवणूक केली तर लोक फक्त एवढेच म्हणायचे, ठिक है, संजय भय्या को आने दो, फिर बताते है .' सामान्य माणसांसोबत संजय गांधीची अशी अटॅचमेंट होती, याच्या अनेक कथा येथील जुने लोक सांगतात .
>> अमेठीच्या जनतेसोबत कौटुंबिक नाते निर्माण केलेल्या संजय गांधी यांच्या अकाली निधनानंतर आपला 'भय्या' गेल्याचे येथील लोकांना मोठे दुःख झाले होते.
पुढील स्लाइडमध्ये पाहा,
>> अमेठीत संजय गांधीची प्रचार रॅली...
>> संजय यांच्या नंतर राजीव गांधीही फिरले पायी
>> दलित वस्तीत राहुल गांधी
बातम्या आणखी आहेत...