आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • How State Secury When Opposition Leader Murdered Rahul Gandhi

विरोधी नेता ठार झालेले राज्य सुरक्षित कसे - राहुल गांधी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगदलपूर(छत्तीसगड) - ज्या राज्यात विरोधी पक्षाचा मोठा नेता ठार झाला असेल, तेथे सामान्य नागरिक सुरक्षित कसे, असा सवाल कॉँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. सत्तेवर आल्यानंतर आदिवासी विधेयक त्वरित आणले जाईल, असे ते म्हणाले.


लालबाग मैदानावर आयोजित सभेत राहुल म्हणाले, राजकीय नेते दोन पद्धतीचे असतात. पहिला जनतेसाठी लढणार तर दुसरा स्वत:साठी लढणारा नेता असतो. आमच्या कॉँग्रेस नेत्यांनी जनतेसाठी प्राण अर्पण केले. 25 मे रोजी कॉँग्रेसच्या नेत्यांवर झालेल्या नक्षली हल्ल्यानंतर राहुल पहिल्यांदाच बस्तरला आले होते. झीरममध्ये कॉँग्रेस नेत्यांवर झालेल्या हल्ला झाला तेव्हा रमन सिंह सरकार काय करत होते.


प्रदेश कॉँग्रेसचे अध्यक्ष नंदकुमार पटेल यांनी मृत्यूपूर्वी आपणास म्हटले होते, या वेळी छत्तीसगडमध्ये कॉँग्रेसचेच सरकार येईल. त्यामुळे त्यांना राजकीय कट रचून ठार करण्यात आल्याचा आरोप राहुल यांनी केला.