आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चक्क मोत्यांची शेती करतो हा माणूस, वर्षाला कमवतो लाखो रूपये

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयपूर- राजस्थानमधील बामणा येथील सत्यनारायण यादव आणि त्यांची पत्नी सजना सीप मोतींची शेती करून महिण्याला 20 ते 25 हाजार रूपये कमवत आहेत. वर्षभरता त्यांना जवळपास 3 लाखांचे उत्पन्न होत आहे. त्यांनी केवळ दहा हजार रूपये खर्चून हा व्यावसाय सूरू केला आहे.


आता दूसऱ्यांना देत आहेत ट्रेनिंग...
-  या दांमत्याने आयसीएआर भुवनेश्वर उडीसामधून 15 दिवसांची ट्रेनिंग घेतली आहे. यानंतर त्यांनी स्वत: मोतीची शेती करण्यास सूरूवात केली.
- सत्यनारायण यादव यांच्याकडे मध्य प्रदेश, जम्मू, हरियाणा, उत्तरप्रदेश, पंजाब, आसाम या रांज्यांमधून लोक ट्रेनिंगसाठी येत आहेत. आता पर्यंत त्यांनी 150 लोकांना ट्रेनिंग दिली आहे.


कसे बनतात मोती...?
- मोती एक नैसर्गीक रत्न आहे, जे सींपल्यात निर्माण होते. नैर्गिकरित्या एका मोत्याची निर्मीती तेव्हा होते, जेव्हा एखादा रेतीचा कण, किंवा इतर काही सिंपल्यात जाते. सिंपला त्याला बाहेर काढू शकत नाही आणि त्याला तो कण टोचायला लागतो. यापासून वाचण्यासाठी सिंपला लाळेसारख्या पदार्थाची निर्मीती करतो, हा पदार्थ या रेतीच्या कणावर जमा होतो आणि त्याचा मोती बनतो.
- याप्रकरारे त्या कणावर अनेक प्रकराचे आवरण जामा होत असते. याच सोप्या पद्धतिचा नैसर्गिक मोती निर्मीतीसाठी वापर करण्यात येतो.

 

अशी करतात मोत्यांची शेती...
- सत्यानारायण यांनी सांगितले की, मोती पालनासाठी पाण्याचा हौद बनवण्यात येतो. यात केरळ, गुजरात, हरिद्वार यासारख्या ठिकाणांहून सिंपले आणून टाकाले जातात.
- सिंपल्यांची सर्जरी करण्यासाठी सर्जिकल टूल्सची आवश्यकता असते. प्रत्येक सिंपल्यालाल थोडे कापून त्यात 4 ते 6 मिमी व्यासाचे साधारण आणि जिझाइनदार बी टाकले जाते. नंतर सिपल्याला बंद केले जाते.
- जवळपास 8 ते 10 महिन्यानंतर सिंपल्याची सर्जिरी करून मोती काढला जातो. जिवंत सिंपल्यातून मोती मिळवला जातो. मोती मिळवल्यानंतर सिंपल्यांचा सजावटीसाठी वापर करण्यातय येतो. याच्या कवरपासून पावडर तयार करण्यात येते. आयुर्वेदीक औषधीसाठी या पावडरचा वापर करण्यात येतो.


पुढील स्लाइडवर पाहा मोत्यांच्या शेतीशी संबंधित काही खास फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...