आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hrd Minister Smriti Irani Visit To Rahul Gandhi Constituency Amethi

राहुल गांधींनी वॉर्निंग दिली, पण मी गप्‍प बसणार नाही; स्‍मृती इराणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एका महिलेला रोपटे देताना स्‍मृती इराणी. - Divya Marathi
एका महिलेला रोपटे देताना स्‍मृती इराणी.
अमेठी - ''मी राहुल गांधी आणि गांधी कुटुंबाविषयी सत्‍य बोलले. त्‍यामुळे त्‍यांनी चिडून मला वकिलामार्फत नोटिस पाठवली. यात त्‍यांनी वॉर्निंग दिली की, मी गांधी कुटुंबाच्‍या विरोधात बोलू नये; अन्‍यथा कायदेशीर कारवाई केली जाईल. मात्र, मी गप्‍प बसणारी नाही. जनेतसाठी बोलणारच'' असे केंद्रीय मानव विकासमंत्री स्मृती इरानी म्‍हणाल्‍या. आज (रविवार) येथे झालेल्‍या एका सभेत त्‍या बोलत होत्‍या. एकाच महिन्‍याच्‍या आत अमेठीमध्‍ये त्‍यांची ही दुसरी सभा होती.
नोटिसला उत्‍तर देणार
इराणी म्‍हणाल्‍या, "अमेठीचे नागरिक मला ताई म्‍हणतात. त्‍यामुळे तुमच्‍या हक्‍कासाठी, न्‍यायासाठी मी लढत राहणार आहे. काँग्रेसच्‍या नोटिसचे उत्‍तरसुद्धा मी देणार आहे.
आहे काँग्रेसचे रिएक्शन?
इरानी यांच्‍या या व्‍यक्‍तव्‍यावर काँग्रेसचे प्रवक्ता अखिलेश प्रताप सिंग म्‍हणाले, "खोटे बोलण्‍याचा आरोप सगळ्यांनाच आहे. मात्र, खोटे आरोप लावण्‍याचा नाही. इराणी यांनी त्‍यांच्‍या गत सभेमध्‍ये गांधी कुटुंबावर असेच खोटे आरोप केले होते. त्‍यामुळे त्‍यांच्‍यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. त्‍याचाच एक भाग म्‍हणून आम्‍ही त्‍यांना नोटिस दिली आहे''.

विद्यार्थी संघटनेने घातला घेराव
विविध मागण्‍यांच्‍या पूर्ततेसाठी विद्यार्थी संघटनांनी स्‍मृती यांना घेराव घातला आणि निवेदन दिले. यावर आपण मुख्‍यमंत्री अखिलेश यादव यांच्‍याशी चर्चा करून सर्व प्रश्‍न मार्गी लावू, असे आश्‍वासन त्‍यांनी दिले.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा संबंधित फोटोज...