आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हरियाणा : गुरुद्वारावरील ताबा प्रकरणी एचएसजीपीसी आणि एसजीपीसीत धुमश्चक्री

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंदिगड - हरियाणामधील कुरुक्षेत्र येथे आज (बुधवार) हरियाणा शीख गुरुद्वारा प्रबंधक कमिटी (एचएसजीपीसी) आणि शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमिटीच्या ( एसजीपीसी) समर्थकांमध्ये धुमश्चक्री उडाली. परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज आणि अश्रुधूराच्या नळकांड्या फोडल्या. या धुमश्चक्रीत काही पोलिस आणि दोन्ही बाजुंचे लोक जखमी झाले आहेत. या घटनेच्या वार्तांकनासाठी आलेल्या माध्यमांच्या प्रतिनिधींसोबतही समर्थकांनी गैरवर्तन केले. माध्यमकर्मींचे कॅमेरे तोडण्यात आले. हरियाणा शीख गुरुद्वारा प्रबंधक समितीच्या समर्थकांनी 9व्या पातशाही गुरुद्वारावर ताबा मिळविल्यामुळे हा हिंसाचार भडकला असल्याची चर्चा आहे.
काय आहे प्रकरण?
9व्या पातशाही गुरुद्वारावर याआधी एसजीपीसीचा ताबा होता. जेव्हा एचएसजीएमसीने यावर ताबा मिळविला तर शिरोमणी समर्थकांनी विरोध सुरू केला आणि यामुळ दोन्ही समर्थकांमध्ये तुंबळ हाणामारी सुरु झाली. या हिंसाचाराच्या घटनेमुळे शहरात तणावग्रस्त वातावरण आहे. कोणत्याही क्षणी येथे हिंसा भडकण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी अधिक कुमक बोलावली आहे.
या घटनेची LIVE छायाचित्रे पाहा पुढील स्लाइडमध्ये