आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Huddud Cyclone Claimed 5 On Andhra, Odisha Coast

‘हुदहुद’चा तडाखा, वादळामुळे आंध्र, ओडिशात पाच जणांचा मृत्यू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विशाखपट्टणम - ‘हुदहुद’ चक्रीवादळ रविवारी आंध्र प्रदेश व ओडिशाच्या किनारपट्टीवर दुपारी बाराच्या सुमारास धडकले. विशाखापट्टणम शहराच्या परिसराला या वादळाचा पहिला तडाखा बसला. सहा तास वादळाचा जोर होता.

आंध्रातील तीन सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि ताशी १८०किलाेमीटर वेगाने वादळी वारे वाहत होते. ओडिशालाही चक्रीवादळाचा असाच तडाखा बसला असून दोन्ही राज्यांत पाच लोकांचा मृत्यू झाला आहे. ओडिशात एके ठिकाणी दरडी कोसळल्या असून वीज व दूरसंचार व्यवस्था कोलमडली आहे. सायंकाळी सहानंतर या वादळाचा जोर कमी कमी झाला असला तरी याच्या प्रभावामुळे तीन दिवस पावसाची शक्यता असल्याचे वेधशाळेने म्हटले आहे.

चक्रीवादळामुळे आंध्र, ओडिशाच्या किनारपट्टीवर ताशी १७० ते १८० कि.मी. वेगाने वादळी वारे वाहत होते. त्यामुळे झाडे उन्मळून पडली, झोपड्या व अनेक घरांवरील पत्रे उडून गेली, भिंती कोसळल्या. श्रीकाकुलम व विजयनगरम जिल्ह्याला वादळाचा मोठा फटका बसला.

दीड लाख सुरक्षित
हुदहुद वादळाचा फटका बसण्याआधी रविवारी आंध्र व ओडिशात जवळपास दीड लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. आंध्रात ९० हजार लोकांना तर ओडिशात ६८ हजार लोकांना हलवण्यात आले.

१५ पर्यंत पाऊस
चक्रीवादळ हुदहुदचा जोर सोमवारपर्यंत बराच कमी होऊ शकतो; परंतु त्यामुळे छत्तीसगड, बिहार, मध्य प्रदेश व उत्तर प्रदेशचा पूर्व भाग, पश्चिम बंगाल आदी राज्यांत १५ऑक्टोबरपर्यंत पावसाचा अंदाज आहे.