आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काही तासांतच रौद्र रूप धारण करेल \'हुडहुड\' चक्रीवादळ, वादळी पावसाचा इशारा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुवनेश्वर- बंगालच्या उपसागरावर उसळलेल्या ‘हुडहुड’ चक्रीवादळाचे संकट आता विशाखापट्टनमच्या किनारपट्टीवर घोंघावताना दिसत आहे. आज (शुक्रवारी) सायंकाळी हे चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकेल. सध्या या चक्रीवादळाचा वेग 149 किलोमीटर वेग असून तो सातत्याने वाढत असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.

'हुडहुड'च्या पार्श्वभूमीवर ओडिसा आणि पश्चिम बंगाल प्रशासनाने हायअलर्ट जारी केला आहे. एनडीआरएफने (NDRF) या दोन्ही राज्यात मदतकार्यासाठी पथके पाठवण्यात आली आहेत. खबरदारी म्हणून समुद्रकिनार्‍यालगतच्या गावांतील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. सध्या हे चक्रीवादळ अंदमान निकोबार बेट पार करत असून पुढील 12 तासांत वादळी वार्‍यासह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

गुरुवार (9 ऑक्टोबर) सायंकाळी हे चक्रीवादळ विशाखापट्टनमपासून 675 किलोमीटर पूर्वेपासून दक्षिण-पूर्व असलेल्या गोपालपूरपासून 685 किलोमीटर अंतरावर होते. किनारपट्टीच्या दिशेने हे वादळ संथ गतीने सरकत आहे. चक्रीवादळामुळे किनारपट्टीभागात मोठे नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून वाचा, केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी केली तिन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्याशी चर्चा...