आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Huge Fire Broke Out At A Biodiesel Unit Near Visakhapatnam

विशाखापट्टनममधील ऑइल डेपोला आग, 6 टँकर्सच्या स्फोटाने किती कोटींचे नुकसान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विशाखापट्टनम - आंध्र प्रदेशातील विशाखापट्टनम जवळील एका बायोडिझेल युनिटला आग लागली. यात ऑइलचे 18 टँकर होते. आग 12 टँकरपर्यंत पसरली आहे. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, आगीने 6 टॅकर्समध्ये स्फोट झाला आहे. आतापर्यंत 120 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. सध्या आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले आहे. मात्र परिस्थिती सामान्य होण्याला आणखी वेळ लागणार आहे.

फायर ब्रिगेडच्या 40 गाड्या
- बायोडिझेलच्या बायोमॅक्स युनिट्सला मंगळवारी रात्री आग लागली.
- आग विझविण्यासाठी फायर ब्रिगेडचे 40 बंब आले होते.
- आग लागली तेव्हा 15 कर्मचारी तिथे उपस्थित होते, ते सर्व आता सुरक्षित आहेत.
- आग कशी लागली त्याची कारणे शोधली जात आहे. मात्र यामुळे आतापर्यंत 120 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
- याआगी कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही.
- मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी अधिकाऱ्यांकडे चौकशी केली.
- केंद्रीय मंत्री गांता श्रीनिवास राव या घटनेवर लक्ष ठेवून आहेत.
- नौदलाचे अधइकारी राजेश शेट्टी म्हणाले, आग विझविण्यासाठी नौदलाने 15 गाड्या पाठविल्या आहेत. आग विझविण्यासाठी जे काही करावे लागेल ते सर्व प्रयत्न केले जातील.
पुढील स्लाइडमध्ये, आग विझविण्यासाठी नौदलाची मदत...