आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बिहारच्या वैद्यकीय महाविद्यालयात 8 हजारांत माणसाच्या सापळ्याची विक्री

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुजफ्फरपूर - बिहारच्या मुजफ्फरपूर येथे श्रीकृष्ण वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात (एसकेएमसीएच) बेवारस मृतदेहांचा सौदा केला जातो. अंत्यसंस्कारासाठी नेमण्यात आलेले सफाई कर्मचारी मृतदेहातील मांस काढून टाकून सापळे विकण्याचा उद्योग करतात. बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली असताना असे धक्कादायक प्रकार घडत आहेत, हे विशेष. बेवारस मृतदेह शवगृहातून सफाई कर्मचाऱ्यांच्या ताब्यात दिला जातो. ते सापळा बनवून विद्यार्थ्यांना ८ ते १० हजारांत विकण्याचे काम करतात. कागदोपत्री पूर्तता करून पैसेही हडप करतात. दैनिक भास्करने केलेल्या स्टिंगमध्ये हा गौप्यस्फोट करण्यात आला. भास्करच्या टीमने ग्राहक बनून गेल्या गुरुवारी त्यांना ५०० रुपये अनामत दिले. तेव्हा त्यांनी लगेच एक सापळा काढून दाखवला.

२०६ हाडे मोजून घ्या - सफाई कर्मचारी
- वार्ताहर : भाऊ, एेक ना. (पोस्टमार्टेम हाऊसच्या समोर पांढऱ्या शर्टातील तरुणासोबत ३-४ लहान मुले आणि आणखी दोन तरुण येतात)
सफाईवाला : बोला. काय म्हणता?
- वार्ताहर : तुम्ही कोण आहात? मला काही खास काम आहे.
सफाईवाला : सांगा ना. आम्ही तुमचे काम करतो ना!
- वार्ताहर : पुतण्याच्या अभ्यासासाठी माणसाचा सापळा हवा होता.
सफाईवाला : अरे... ए.. भय्या.. यांना हाडे पाहिजेत. पाहून घ्या.
- वार्ताहर : हाडे नाही. सापळा हवा.
सफाईवाला : हा, तेच. आम्ही सापळाच म्हणतो. कोणत्या कॉलेजमध्ये आहे तो? कधी हवा?
- वार्ताहर : वर्धमानमध्ये शिकतो. आता मिळेल?
सफाईवाला : आता.. हे पाहा.. (सहकाऱ्यास काही इशारा करतो. उत्तर इशाऱ्यानेच मिळते. )हां.. हां.. आता देतो. किती पाहिजेत?
- वार्ताहर : आता तर एकच पाहिजे. जास्तीचे मिळतील काय?
सफाईवाला : हो. पाहिजे तेवढे मिळतील. एक तयार सापळा तर लगेच मिळेल. जास्तीसाठी एक ते दोन दिवस तर वेळ लागेल.
- वार्ताहर : उद्यापर्यंत किती मिळतील? पैसे किती लागतील?
सफाईवाला : उद्यापर्यंत ... (सहकाऱ्यांशी बोलून) किती मिळतील रे.. दिवसरात्र काम आहे. दोघेही - हाे. चार तर तयार होतील. मजबूत बॅग आणा.
- वार्ताहर : नको. तीनच हवेत. पैसे किती? सडले तर? कुणी पकडले तर?
सफाईवाला : नाही सर.. सडलेला नसतो. आम्ही आधीच मांस खरडून काढून टाकतो. मग हाडे उकळतो. वाळल्यानंतरच या खोक्यात ठेवतो.
- वार्ताहर : कोणत्या बॉडीतून हाडे काढता?
सफाईवाला : बेवारस रुग्ण मरतात. त्यांच्या शरीराचा हा सापळा तयार करतो. काही शव अपघातात मेलेल्या वेड्यांचेही असतात.
- वार्ताहर : बॉडी तर जाळतात ना! रुग्णालय.. किंवा दफन करत असाल?
सफाईवाला : नाही. काही जाळत नाही. तुम्हाला काय करायचे? माणसाची २०६ हाडे माेजून घ्या.
- वार्ताहर : आधी पैसे किती घ्याल?
सफाईवाला : एकाचे ८ हजार रुपये.
- वार्ताहर : का रे बाबा? एक सापळा चार हजारात विकला जातो. काही कमी कर ना. (घासाघीस केल्यानंतर )
सफाईवाला : शेवटी ७ हजारात देऊ. तुम्ही ३ घेतले तर २० हजार लागतील. आता काही पैसे द्यावे लागतील. मग बॉडी तयार करू.

हा तर कायद्याने गुन्हा : प्राचार्य, एसकेएमसीएच
हाडांचा व्यापार बेकायदा आहे. एसकेएमसीएचमध्ये दावा न केलेल्या बाॅडी किंवा काही पार्ट किंवा हाडे विद्यार्थ्यांसाठी वापरता येतात. एफएमटी आणि अॅनाटाॅमी विभागात कधी-कधी असे घडते. पण हाडांची खरेदी-विक्री संस्थेत केली जात नाही. बाहेर ते खरेदी-विक्री करणाऱ्यालाच माहिती असेल. आर्टिफिशियल हाडे बाजारात दर्जानुसार १० पासून ५० हजारांपर्यंत मिळतात. पोलिस त्यांनी आणलेल्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करतात, तर रुग्णालयातील बेवारस शवांचे अंत्यसंस्कार विभागीय पातळीवर होतात. दुसरीकडून हाडे आणत असावा. पण हा गुन्हा आहे. - डाॅ. प्रा. विकास कुमार, प्राचार्य एसकेएमसीएच

हे जर खरे असेल तर गंभीर बाब
या संपूर्ण प्रकरणाचा मी अभ्यास करतो. प्रकरण बॉडीची योग्य विल्हेवाट न लावण्यावरून आहे की अार्थिक भानगडी आहेत, याचा अभ्यास करून पुढील कारवाई करताे. - अतुल प्रसाद, आयुक्त, तिरहुत मंडळ
बातम्या आणखी आहेत...