आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राम रहिमच्या बगिच्यात हत्येचे अनेक रहस्य दफन, झाडांखाली सापडतील मानवी सापळे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिरसा- डेरा सच्चा सौदामध्ये काम  केल्याचा दावा करणारे साधू गुरदाससिंग तूर यांनी डेरा प्रमुख गुरमीत राम रहीमवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. डेराजवळील बाग-बगिच्यात हत्येचे अनेक रहस्य दफन आहेत, असा गुरदास यांचा दावा आहे. याची सखोल चौकशी झाल्यास झाडाच्या मुळाशी सापळे सापडतील, असे त्यांनी सांगितले.  

गुरदास यांनी सांगितले, डेरा बाबाच्या इशाऱ्यावरून अनेक हत्या करण्यात आल्या. गुुंफेजवळील बगिच्यात जेथे मृतदेह दफन करण्यात आले तेथेच झाडे लावण्यात आली. गुंफेचे नव्याने बांधकाम सुरू झाले तेव्हाही प्रकरणे उजेडात येऊ नयेत म्हणून झाडे तोडण्याची परवानगी नव्हती. १९९६ पासून २००२ पर्यंत स्वत:ला डेराचा साधू असल्याचा दावा करणारे गुरदास यांनी सांगितले, डेराचा माजी व्यवस्थापक फकिरचंद आजवर बेपत्ता आहे. ज्या खोलीमध्ये फकिरचंद राहत होता, ती खोली २००९-१० मध्ये  पाडून सुमारे ६ फुटांपर्यंत जमीन खोदण्यात आली होती. अशा प्रकारे राजू उर्फ दिनेश नावाचा मुलगाही २००६ पासून गायब झालेला आहे. तो तत्कालीन व्यवस्थापक इंद्र सेन यांचा सहायक म्हणून काम करत होता. त्याला नपुंसक करून साधू करण्यात आले. त्याला एक बहीण असून तिला साध्वीची दीक्षा देण्यात आली. तिच्या नावावर डेराच्या सर्व साधंूच्या नावांची पॉवर ऑफ अॅटर्नी करण्यात आली होती. तेव्हापासून ती बेपत्ता आहे. 

हनीप्रीतला मुंबईत पकडल्याची चर्चा  
राम रहीमची मानलेली मुलगी हनीप्रीतला मुंबई विमानतळावर अटक करण्यात आल्याची चर्चा आहे. ती वेशांतर करून ऑस्ट्रेलियाला जाणार होती. पोलिसांनी तिचा पासपोर्ट जप्त केला असून त्यावर तिचे नाव प्रियंका तनेजा असे आहे. मात्र, मुंबई पोलिसांनी याचा इन्कार केला. परंतु पंचकुलाचे पोलिस प्रमुख यांचा दावा आहे की, हनीप्रीत मुंबईत असल्याची माहिती मिळाली आहे. तिला कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते. तिच्यासोबत चार साथीदार असल्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. हनीप्रीतला राम रहीमची सर्व रहस्ये माहिती आहेत. त्यामुळे तिचा शोध घेणे खूप महत्त्वाचे आहे, असे पोलिस महानिरीक्षक बी. एस. संधू यांनी सांगितले

शस्त्रे जमा करण्याचा अवधी समाप्त, प्रशासनाचा इशारा : कधीही धाड पडेल  
डेरा सच्चा सौदामध्ये डेराच्या नावे परवाना असलेली शस्त्रे सिरसा पोलिस ठाण्यात जमा करण्याचा अवधी शनिवारी संपला. तरीसुद्धा रविवारी डेरा व्यवस्थापनाने कोणतीही शस्त्रे जमा केली नव्हती. यावर जिल्हा प्रशासनाने कठोर भूमिका घेत डेरा प्रमुखांना लवकरात लवकर शस्त्रे जमा करण्याचा इशारा दिला आहे. सध्या ६७ परवानाधारक शस्त्रे डेराकडे आहेत. त्यापैकी केवळ २७ शस्त्रे ठाण्यात जमा झाली. यामध्ये १४ रिव्हॉल्व्हर, ९ बंदुका आणि चार रायफल्सचा समावेश आहे. १० शस्त्रे डेराच्या बाहेर असून ती गायब असल्याचे सांगण्यात येते.  

डेरा संस्थापक मस्ताना यांनी केली हनीप्रीतच्या आजोबांची डेराच्या ‘खजिनदार’पदी नियुक्ती 
हनीप्रीतचे आजोबा रामशरण दास तनेजा आणि आजी कुलवंत तनेजा यांचे डेराचे संस्थापक शहा मस्ताना यांच्याशी त्यांच्या कार्यकाळापासून संबंध होते. शहा मस्ताना यांनी हनीप्रीतच्या आजोबांना खजिनदार म्हणून नेमले. तेव्हापासून रामशरण तनेजा यांना डेराप्रेमी “खजांची जी’या नावाने संबाेधत असत. डेरात तनेजा परिवारांचा दबदबा वाढत गेला. रामशरण तनेजा यांच्या निधनानंतर हनीचे आईवडील सिरसा येथे आले आणि डेरामध्ये राहू लागले.   

जन्मतारखा वेगवेगळ्या  
राम रहीमच्या जन्मतारखा वेगवेगळ्या होत्या, यावरूनही सिरसा शहरात चर्चा रंगत असे. डेरा बाबा त्यांचा वाढदिवस १५ ऑगस्ट रोजी साजरा करत होते. त्यांचा जन्म राजस्थानातील श्रीगंगानगरातील श्री गुरुसर मोडिया येथे झाल्याचे सांगण्यात येते. त्यानुसार, गुरमीतसिंग यांचा जन्म  १० जुलै १९६७ रोजी पंजाबमधील किकरखेडा या आजोळी झाला, तर त्यांच्या १९८४ च्या माध्यमिक शालांत परीक्षेच्या गुणपत्रिकेवर त्यांची जन्मतारीख १५ ऑगस्ट १९६७ दर्शवली आहे.
बातम्या आणखी आहेत...