आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रियाधमध्ये हैदराबादच्या तरुणीचे शोषण, सुटकेसाठी दोन बहिणींचे सुषमा स्वराज यांना साकडे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रेशमाने म्हटले आहे, की तिने स्थानिक पोलिसांकडे संपर्क केला होता, मात्र त्यांनी एजंटविरोधात कोणतीही कारवाई केली नाही. - Divya Marathi
रेशमाने म्हटले आहे, की तिने स्थानिक पोलिसांकडे संपर्क केला होता, मात्र त्यांनी एजंटविरोधात कोणतीही कारवाई केली नाही.
हैदराबाद (तेलंगणा) - सौदी अरेबियाची राजधानी रियाधमध्ये हैदराबादच्या एका तरुणीचे लैंगिक शोषण झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. नोकरीच्या निमित्ताने सौदी अरेबियाला गेलेली हैदराबादमधील तरुणी घरमालकाच्या टॉर्चरची शिकार झाली आहे. महिलेच्या हैदराबाद येथील कुटुंबियांनी केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्याकडे मदतीची याचना केली आहे. पीडित तरुणीचे नाव हुमैरा असल्याची माहिती असून रियाधमध्ये ती घरकाम करत होती. ज्या घरात हुमैरा काम करत होती, त्या घरमालकानेच तिचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे.
हुमैराच्या बहिणींनी स्वराज यांच्याकडे मदतीची याचना करत तिला परत आणले नाही तर, ती आत्महत्या करण्याची शक्यता व्यक्त केली आहे. 
 
तिला सोडवले नाही तर ती आत्महत्या करेल...
- एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, 23 जुलै रोजी हुमैरा रियाधला गेली होती. तेव्हापासून घरमालक तिला टॉर्चर करत होता. हुमैराच्या बहिणी रेशमा आणि मुस्कान यांनी ही माहिती दिली आहे. 
- रेशमाने परराष्ट्र मंत्रालयाला पत्र लिहून मदतीची याचना केली आहे. रेशमाने पत्रात म्हटले आहे, सुषमाजी माझी बहिण रियाधमध्ये आहे, तिला तेथून सोडवावे. 
- रेशमाने म्हटले आहे, की तिने स्थानिक पोलिसांकडे संपर्क केला होता, मात्र त्यांनी एजंटविरोधात कोणतीही कारवाई केली नाही. रेशमाने सांगितल्यानुसार, तिच्या बहिणीने म्हटले आहे की तिला सोडवले गेले नाही तर ती आत्महत्या करेल. 

एजंटने फसवल्याचा रेशमाचा आरोप 
- रेशामाने सांगितले, की एजंट सईदने हुमैराशी संपर्क करुन तिला सौदी अरेबियामध्ये नोकरी मिळवून देण्याचे अमिष दाखवले होते. सईदने सांगितले होते की हुमैराला एका छोट्या कुटुंबाची देखभाल करावी लागेल. त्या मोबदल्यात 25 हजार रुपये दरमहिना मिळतील. 
- रेशमाने सांगितले, 'सईदने हुमैराला उमराची संधीही दिली जाईल, असे आश्वासन दिले होते. मात्र थोड्या दिवसातच ती जिथे काम करते त्या घरमालकाने तिला मारहाण आणि टॉर्चर करण्यास सुरुवात केली. तिला पोटभर जेवणही मिळत नव्हते.'
- एका ठिकाणी काम करत असताना तिच्या घरमालकाने तिच्यावर वाईट नजर टाकली होती. चुकीच्या इराद्याने तिला जवळही ओढले होते, पण ती घरात पळाली आणि दार आतून बंद करुन घेतले होते. त्यानंतर 4-5 दिवस तिला रुममध्ये बंद करुन ठेवण्यात आले होते. पळून जाण्याचा प्रयत्न केला तर जीवे मारण्याची धमकी देण्यात आली.

रियाधमध्ये आधीही घडल्या अशा घटना 
- सौदीमध्ये भारतीय महिलांवर अत्याचाराच्या घटना याआधीही घडल्या आहेत. हैदराबादमधीलच जबीना बेगम यांचे प्रकरण जूनमध्ये समोर आले होते. तिला एका डॉक्टर दाम्पत्याने घरात कैद केलेले होते. बळजबरीने काम करुन घेणे आणि थोड्या-थोड्या चुकीसाठी बेदम मारहाण सहन करावी लागत होती. तिच्यावरील अत्याचाराची माहिती मिळाल्यानंतर तिचा भाऊ मोहम्मद हमीद खान याने सुषमांकडे मदतीची मागणी केली होती. 
- याआधी मेमध्ये हसीना बेगमचे प्रकरण समोर आले होते. ती सौदीमधील दम्मम येथे घरकाम करत होती. तिथे तिच्याकडून खूप काम करुन घेतले जात होते. सुषमा स्वराज यांच्याकडे मदतीची मागणी केल्यानंतर हसीनाला सुरक्षित घरी आणण्यात आले होते. 
- जालंधरची सुखवंत कौर 31 मे रोजी भारतात परत आली आहे. टुरिस्ट ऑपरेटरने तिची दुबईमध्ये विक्री केली होती.