आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Humers And Disappointing Over Jayalalithaa's Bail, Divya Marathi

अम्मांच्या जामिनाच्या अफवेने उत्साह आणि नंतर निराशा ! जामिनास हायकोर्टाचा नकार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरू - बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी सध्या तुरुंगात असलेल्या तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जे. जयललिता यांना कर्नाटक उच्च न्यायालयाने मंगळवारी जामीन नाकारला. विशेष न्यायालयाने गेल्या २७ सप्टेंबरला त्यांना शिक्षा जाहीर केल्यापासून त्या कैदेत आहेत. याप्रकरणी जामीन नाकारताना उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ए. व्ही. चंद्रशेखर यांनी जयललितांना विशेष न्यायालयाने ठोठावलेल्या शिक्षेला स्थगिती देण्यासंबधीच्या याचिकेवर सुनावणीस नकार दिला. विशेष न्यायालयाने मालमत्तेच्या प्रकरणात ४ वर्षे कैद व १०० कोटी दंड ठोठावला.

मंगळवारी सुनावणी सुरू होताच जयललितांना जामीन मंजूर झाल्याची बातमी पसरली. कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव सुरू केला. मात्र काही वेळात ही बातमी केवळ अफवा असल्याचे लक्षात आले. कार्यकर्त्यांचा उत्साह एकदम मावळला. सुनावणी सुरू झाल्यानंतर सरकारी वकील जी. भवानीसिंह यांनी जयललितांना सशर्त जामीन मंजूर करण्यास विरोध दर्शवला नाही. यामुळे जामीन मंजूर झाल्याची बातमी सर्वत्र पसरली.

पोस्टरमुळे वादंग
जयललितांना तत्काळ मुक्त केले नाही, तर तामिळनाडूत राहणा-या कानडी लोकांचे अपहरण केले जाईल, असा इशारा देणारे फलक दक्षिण चेन्नईमध्ये झळकले आिण एकच गोंधळ उडाला. अण्णाद्रमुकच्या नेत्यांनी फलक लावणा-या कार्यकर्त्यांशी पक्षाचा काहीही संबंध नसल्याचे सांगितले.

मानवाधिकाराचे उल्लंघन
भ्रष्टाचार म्हणजे मानवाधिकाराचे थेट उल्लंघन आहे. यामुळे आर्थिक संतुलन ढासळते. या स्थितीत जयललितांना जामीन देणे योग्य ठरणार नाही.
न्यायमूर्ती ए. व्ही. चंद्रशेखर