आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हुरियत नेते सय्यद अली शहा गिलानींची इिससवर टीका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगर - हुरियत कॉन्फरन्सचे नेते सय्यद अली शहा गिलानी यांनी इसिसवर टीका केली आहे. इस्लामिक स्टेट या संघटनेचा केवळ दहशतवादाशी संबंध असून ती इस्लामचे प्रतिनिधित्व करत नसल्याचे गिलानी म्हणाले. इसिसप्रमाणेच तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तान आणि तत्सम सर्वच गट इस्लामचे प्रतिनिधित्व करत नाहीत. दाएश (इसिसचे पर्यायी नाव) फक्त एक दहशतवादी गट आहे. निरपराधांचे बळी घेणेच त्यांचे काम आहे. तेहरिक-ए-तालिबान संघटना पाकिस्तानला आतून पोखरून काढत अाहे, असे मत विघटनवादी नेते गिलानी यांनी व्यक्त केले.

काश्मीरमधील आंदोलनांदरम्यान काही तरुणांनी इसिसचा ध्वज वापरला त्यावर गिलानींनी ही प्रतिक्रिया दिली. एतद्देशीय मुस्लिमांनी आंदोलनात इसिसचा ध्वज वापरणे चुकीचे असल्याचे गिलानी म्हणाले.

केंद्र दुटप्पी असल्याचा दावा
केंद्र सरकारवर त्यांनी टीका केली. केंद्र संवादाची भाषा करत आहे. मात्र, काश्मीर भारताचा अविभाज्य भाग असल्याच्या भूमिकेवरही ठाम आहे. केंद्राचे हे दुटप्पी धोरण असल्याचे गिलानी म्हणतात. भारत सरकारच्या ताठर धोरणाने पूर्वीही काही झाले नाही आणि भविष्यातही काही हशिल होणार नाही. केंद्र सरकार कालहरण करण्यासाठीच वाटाघाटींची भाषा करत आहे, अशी टीका गिलानींनी केली.
बातम्या आणखी आहेत...