- Marathi News
- Hurriyat Leaders Hiring Contract Killers To Silence Rivals
ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
पैशासाठी दहशतवादी होताहेत सुपारी किलर, आर्थिक चणचणीवर शोधला उपाय
श्रीनगर - काश्मीर खोर्यात सक्रिय असलेल्या दहशतवाद्यांना आर्थिक चणचण भासत असून पैशासाठी ते आता खुनाच्या सुपार्याही घेत आहेत. म्हणजेच पैसे घेऊन खून करत आहेत.
सोपोरच्या सीलू गावात शनिवारी रात्री उशिरा तीन अतिरेकी खजीर मोहंमद नेकू यांच्या घरात घुसले आणि बेछूट गोळीबार केला. यात खजीर व त्यांच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला. चार गोळ्या लागल्याने त्यांचा पुतण्या शब्बीर गंभीर जखमी झाला होता. उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला. आहे. या प्रकरणी तपासानंतर धागेदोरे लागले तेव्हा पोलिसांनी मेहराजुद्दीन खानला त्याच्या घरातून उचलले. चौकशीदरम्यान जमिनीच्या वादातून नेकूचा बदला घेण्यासाठी त्याने हिजबुलचा अतिरेकी जावेद अहमद मट्टूला सुपारी दिल्याचे निष्पन्न झाले. इतर हल्लेखोरांचा शोध सुरू आहे.