आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पतीने केली आईसोबत ट्रेन खाली आत्‍महत्‍या, शेजाऱ्यांनी सांगितले पत्‍नीचे कारनामे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आरोपी मोनिका. - Divya Marathi
आरोपी मोनिका.
जालंधर(पंजाब)- किशनपूर येथे पत्‍नीच्‍या त्रासाला कंटाळून एका युवकाने आपल्‍या आईसोबत ट्रेनखाली आत्‍महत्‍या केली. विशेष म्‍हणजे या माय-लेकांनी यापूर्वीसुद्धा दोन वेळा आत्‍महत्‍येचा प्रयत्‍न केला होता. रमनकुमार सहदेव (33) आणि त्‍यांच्‍या आई तृप्ता असे मृतांचे नाव आहे.

शेजाऱ्यांनी सांगितले पत्‍नीचे कारनामे...

> या प्रकरणी शेजाऱ्याने पोलिसांत तक्रार दिली.
> पोलिसांनी रमन यांची पत्‍नी मोनिका हिच्‍याविरुद्ध आत्‍महत्‍येस प्रवृत्‍त केल्‍याचा गुन्‍हा दाखल केला.
> किशनपूरमध्‍ये रमन हा 'आरके वेल्डिंग' नावाचे वर्कशॉप चालवत होता. त्‍याचे वडील राजिंदर कुमार यांचे पाच वर्षांपूर्वी निधन झाले.
> सात वर्षांपूर्वी रमनचे लुधियाना येथील मोनिकासोबत लग्‍न झाले.
> या दाम्‍पत्‍याला एक सहा वर्षांचा वरुण नावाचा मुलगा आहे.
> डीएसपी मक्खन सिंह यांनी सांगितले, रमनचे शेजारी राजेश कुमार यांनी या प्रकरणी तक्रार दिली.
> मोनिका रमन आणि त्‍याच्‍या आईला नेहमीच त्रास देत असल्‍याचा आरोप त्‍यांनी केला.
त्‍या दिवशी नेमके काय झाले ?
> सोमवारी सकाळी मोनिका, तिची आई किरण, बहीण बिंदू आणि इतर काही लोक रमनच्‍या घरी आले.
> मोनिका आणि तिच्‍या सासरकडील मंडळींनी रमन आणि त्‍याच्‍या आईसोबत वाद घातला.
> त्‍यावर रमनची आई तृप्‍ता म्‍हणाली आज आम्‍ही शांत होणार आहोत. त्‍यानंतर काहीच वेळात त्‍यांनी आत्‍महत्‍या केली.
रोज मागत होती दोन हजार रुपये
> रमनची मोठी बहीण पूनमचे पती वरिंदर यांनी सांगितले, मोनिका ही पैशासाठी रमनला त्रास देत होती.
> रमनने दीड लाख रुपयांचे कर्ज काढून तिला दागिने घेऊन दिले होते.
> ती रमनकडे रोज दोन हजार रुपये मागत होती.
> एवढेच नाही तर मोनिकाने अनेकावेळा आपल्‍या सासूला मारहाणही केली.
> तिची सासू तिला खूप घाबरत असे.
> रमनला तिच्‍याकडून घटस्‍फोट हवा होता. पण, अगोदर घर नावे करून दे नंतरच घटस्‍फोट देईन, अशी भूमिका मोनिकाने घेतली होती.

पुढील स्लाइड्सवर पाहा, मोनिकाच्‍या कुटुंबीयांचे फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...