आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विष्णूचा अवतार समजून त्याने पत्नीस झोडपले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राजकोट- स्वत:ला विष्णूचा अवतार असल्याचे सांगत मला अटक करा, अशी विचित्र कैफियत मांडणाऱ्या व्यक्तीला पाहून महिला पोलिस ठाण्यातील कर्मचारी पुरते गोंधळून गेले. त्याने पोलिसांना सांगितले, “मी विष्णूचा अवतार आहे. माझ्यात आई अंबाबाईचा निवास आहे. आईच्या आज्ञेनेच मी येथे आलो आहे. 

मला अटक करा.’ पत्नीला मारहाण केल्याच्या अारोपावरून अटकेत असलेल्या रमेश फेफरे या व्यक्तीची ही कथा आहे. माझी पत्नी लक्ष्मीचा अवतार अाहे. मात्र, तिच्या शरीरात प्रभाकर नावाच्या राक्षसाने प्रवेश केला आहे. त्याला बाहेर काढण्यासाठी तिला शिक्षा देतो. मला त्याचे वाईट वाटत नाही, असे तो म्हणाला. 
बातम्या आणखी आहेत...