आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पतीने केले दुसरे लग्न, पहिली घरी आली तर काठी आणि लाथा-बुक्यांनी \'स्वागत\'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राजसमंद (राजस्थान) - विवाहितेला तिच्या पती व सासरच्या मंडळींनी काठी आणि लाथा-बुक्यांनी बेदम मारहाण केली. पीडिता जेव्हा तक्रार घेऊन पोलिस स्टेशनला गेली तेव्हा तिथे कोणीही तिचे ऐकून घेतले नाही. जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे गार्‍हाणे मांडले तेव्हा पोलिसांनी तिच्या सासरच्या मंडळीविरोधात तक्रार नोंदवून घेतली. विशेष म्हणजे हे तेच पोलिस आहेत ज्यांच्या नावाचा डंका राज्यात सर्वत्र वाजत आहे.मात्र तरीही राजसमंद मधील महिलांवरील अत्याचार कमी झालेले नाहीत.
खमनोर मधील शिशोदा येथील रेखा (32) हिचा पती खीमसिंह उर्फ रमेशसिंह चदाणा राजपूत याने घटोस्फोट न घेता 26 एप्रिल रोजी एका तरुणीशी विवाह केला आणि विवाहाचे भोजन दिल्याची माहिती रेखाला पाच जून रोजी मिळाली. त्यानतंर ती आईसह सासरी भागल येथे पोहोचली . तेव्हा पती खीमसिंह, सासरे आणि भाया आणि सवत रंभाबाई यांनी तिला लाठी आणि लाथा-बुक्यांनी बेदम मारहाण केली. आरोपींनी तिला ओढत घराबाहेर काढले. गावकर्‍यांनी मध्यस्थी करत तिची त्यांच्या तावडीतून सुटका केल्याचे तिने पोलिसांना सांगितले आहे. या मारहाणीनंतर रेखा पोलिस स्टेशनमध्ये सासरच्या लोकांविरोधात तक्रार देण्यासाठी गेली मात्र पोलिसांनी तिची बाजू ऐकून घेतली नाही आणि तिला हुसकावून लावले.
पीडितेचा आरोप आहे, की खीमसिंह हुंड्याची मागणी करतो आणि तिला व तिचा सात वर्षांचा मुलगा अंशुमन याला मारहाण करतो. यामुळे तिने पती आणि सासरच्या मंडळींवर हुंडाबळीचा खटला दाखल केला आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना त्याने एप्रिलमध्ये दुसरे लग्न केले.
वैद्यकीय तपासणी व एफआयआर दाखल करण्याचे आदेश
रेखाच्या तक्रारीनुसार खमनोर पोलिसांना खीमसिंह आणि इतरांवर गुन्हा दाखल करण्यास सांगण्यात आल्याचे राजसमंदच्या पोलिस अधीक्षक श्वेता धनखड यांनी सांगितले आहे. त्या म्हणाल्या, पीडितेचे म्हणणे मी ऐकले आहे. त्यानंतर पोलिसांना तिची वैद्यकीय तपासणी करुन आरोपींविरोधात कारवाईचे आदेश दिले.