आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Husband Caught Red Handed, Wife Furiously Beats Him

VIDEO: प्रेयसीसोबत रंगेहाथ पकडला खणिकर्म अधिकारी, पत्नीने केली यथेच्छ धुलाई

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माय-लेकीने सूद यांना महिलेच्या घरात पकडले - Divya Marathi
माय-लेकीने सूद यांना महिलेच्या घरात पकडले
रायपूर/कोरबा - कोरबा येथील खणिकर्म विभागातील एका अधिकाऱ्याला त्याच्या पत्नीने व्हॅलेंटाइन वीकमध्ये अशी भेट दिली की तो आयुष्यभर ती विसरणार नाही. झाले असे, की अधिकारी दुसऱ्या एका महिलेच्या घरी मुक्कामी होता. त्याच्या पत्नीने त्याला रंगेहाथ पकडले आणि सर्वांसमोर चपलेने त्याची यथेच्छ धुलाई केली. याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

काय आहे प्रकरण
कोरबाचे सहाय्यक खणिकर्म अधिकारी एन.के.सूद यांच्या पत्नीला पतीच्या रासलिलांची माहिती मिळाली. पतीला धडा शिकवायचा, असे ठरवून त्यांनी अमेरिकेत शिक्षण घेत असलेल्या मुलीला बोलावून घेतले.

सर्व तयारीने घातली धाड
दरम्यान, पत्नीला कळाले की पती कटघोरा गावात एका महिलेच्या घरी आहे. त्याला रंगेहाथ पकडण्यासाठी ती मुलीला घेऊन निघाली. सोबत काही पत्रकारांनाही घेतले.

मुलीने उपटले महिलेचे केस
एन.के. सूद यांच्या मागावर असलेली त्यांची पत्नी आणि मुलगी कटघोरा गावात एका घराजवळ गेल्या. बराच वेळ दार वाजवल्यानंतर सूद बाहेर आले. दरवाजा उघडताच माय-लेकींनी सूद यांच्यावर हल्ला केला. पत्नीने हातात चप्पल घेऊन पतीची कॉलर पकडून त्याला काही कळण्याच्या आत त्याची धुलाई सुरु केली. सूद यांच्या अमेरिकेत शिकत असलेल्या मुलीने महिलेला शिव्यांची लाखोली वाहात तिला बेदम चोप दिला. सूद यांच्या पत्नीसोबत आलेल्या लोकांनी महिलेला पकडले आणि पत्नीने पतीला जाब विचारत मारहाण केली.

स्वतः व्हायरल केला व्हिडिओ
अशी माहिती आहे, की अधिकाऱ्याच्या पत्नीने मारहाणीचा व्हिडिओ स्वतः सोशल साइटवर अपलोड केला. यापुढे पतीचे पाऊल 'वाकडे' पडू नये यासाठी त्याच्या पत्नीने असे केले. मात्र या प्रकरणाची पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली नाही.

अधिकाऱ्याचा बोलण्यास नकार
या घटनेवर खणिकर्म अधिकारी सूद यांनी काहीही बोलण्यास नकार दिला. त्यांच्या पत्नीने हा कौटुंबिक वाद असल्याचे सांगत पोलिस तक्रार देण्यास नकार दिला.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, व्हिडिओ आणि संबंधित फोटो...