आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लग्नाच्या 14 दिवसांनी पती, सासूसारख्यांचा दुर्घटनेत मृत्यू, सून झाली पोरकी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अजमेर (राजस्थान)- अजमेर-जयपूर हायवेवर झालेल्या भीषण अपघातात नवविवाहितेचा पती, सासूसारखे मृत्युमुखी पडले आहेत. त्यांच्या लग्नाला केवळ 14 दिवस झाले होते. तिच्या हाताची मेंदीही अजून निघालेली नाही. या अपघातात नवविवाहिता आणि तिची नणद गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
असा झाला अपघात
- 68 वर्षांचे किशनगडचे अशोक सांखला मार्बल व्यवसायी आहेत. त्यांच्या पत्नीचे नाव मंजुदेवी आहे.
- घटनेच्या दिवशी अशोक, मंजुदेवी, मुलगा राकेश, त्याची पत्नी सोनल जैन आणि नणद एका कार्यक्रमासाठी उदयपूरला जात होते.
- या दरम्यान जयपूर-अजमेर हायवेवर एका गाईला वाचविण्याच्या प्रयत्नात त्यांची कार अनियंत्रित झाली.
- ही कार दरीत जाऊन कोसळली. तेथील एका भिंतीला कारने जोरदार धडक दिली.
- या घटनेत कार पूर्णपणे चक्काचूर झाली.
पती आणि सासूसारख्यांचा जागीच मृत्यू
- अपघात एवढा भीषण होता, की अशोक, मंजुदेवी, राकेश यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.
- सोनल आणि नणद गंभीर जखमी झाल्या. लोकांनी त्यांना कारबाहेर काढून हॉस्पिटलमध्ये दाखल केले.
- दोघींची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत.
पुढील स्लाईडवर बघा, या भीषण अपघाताचे फोटो....
बातम्या आणखी आहेत...