आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वंशाचा दिवा मुली! डोलीत बसून नवरदेव आला, नवरीचे आडनावही लावले; डेरा सच्चाचा उपक्रम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गोविंदगड (पंजाब) - पंजाबमधील भटिंडामध्ये एक आगळावेगळा विवाह झाला. सर्वांना आश्चर्याचा धक्काही बसला. या ठिकाणी नवऱ्या मुलाने नवरीची भूमिका पार पाडली. नवरीने बाशिंग बांधले, तर नवऱ्याने हातांवर मेंदी सजवली. कृपाण हाती घेऊन मुलगी वरात घेऊन मुलाच्या घरी गेली. सहसा नवऱ्या मुलाच्या वरातीचे स्वागत होते तसे मुलीच्या वरातीचे जंगी स्वागत झाले. लग्नही लागले. आता सासरी जाण्याची वेळ होती. नवरा मुलगा कुटुंबीयांच्या गळ्यात पडून रडला. डोलीत बसून सासरी निघाला.
 
मुलीच्या घरी त्याचे स्वागत सुनेचे जसे स्वागत होते तसे करण्यात आले. आता मुलींच्या नावापुढे जसे नवऱ्याचे आडनाव लागते तसे या नवऱ्याने पत्नीचे आडनाव लावले. हा मुलगा आता सासरीच राहील. बलजित आणि सुखमिंदरसिंग असे या नवदाम्पत्याचे नाव आहे. १२वी उत्तीर्ण असलेला सुखमिंदर एलआयसीमध्ये आहे.
 
लग्नाबद्दल विचारले तेव्हा तो म्हणाला, “माझ्या घरी एक लहान भाऊ आणि बहीण आहे. ते आई-वडिलांची काळजी घेऊ शकतील. बलजित एकुलती एक आहे. ती लग्न करून सासरी गेली तर तिच्या आई-वडिलांची काळजी कोण घेईल? मी आता माझी बदली येथे करून घेईन.’ १२वी झालेली २७ वर्षीय बलजित ब्युटिक चालवते. ती म्हणाली, “माझ्या घरी माझ्यापेक्षा थोरल्या चार बहिणी आहेत. एक भाऊ होता, मात्र त्याचे निधन झाले. आता मी आई-वडिलांची काळजी घेऊ शकेल.’
 
गेल्या २६ फेब्रुवारीला डेरा सच्चा सौदाचे प्रमुख गुरमित राम रहीम यांच्या उपस्थितीत हा विवाह झाला. वकिलांच्या साक्षीने हा विवाह झाला. उद्देश हा की, यानंतरच्या काळात वंशाचा दिवा मुलगा नव्हे, मुली हा वंश चालवतील. डेरा सच्चा सौदाच्या परिवारातील हा असा १९ वा विवाह होता.

मुलीची आई म्हणाली, जावई नव्हे, माझ्या मुलाने सून आणली आहे
बलजितची आई जसविंदर म्हणाली, माझी मुलगी नवऱ्याला घेऊन घरी आली असे नाही... मी म्हणेन माझ्या मुलाने सूनच घरी आणली आहे. तिने असा विवाह केला नसता तर आमच्या पश्चात घराला कुलूपच घालावे लागले असते.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...