आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पती परदेशात गेला तर दीरासोबत ठेवले अवैध संबंध, वहिणीसाठी पत्नीचे केले असे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पटियाला - वहिणीसोबतच्या अवैध संबंधात अडचणीच्या ठरणाऱ्या पत्नीचा पतीने खून केला. मर्डरनंतर दीर-भावजय फरार झाले आहेत. अशी माहिती आहे की मोठा भाऊ नोकरीच्या निमीत्ताने दुबईला गेल्यानंतर दीर-भावजय यांच्यात जवळीक वाढली. घरातच सुरु असलेले अवैध संबंध पत्नीच्या नजरेतून सुटले नाही. त्यानंतर घरात रोज वाद सुरु झाले.

मृत महिलेच्या अस्थी तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबला
- महिलेचा खून केव्हा आणि कसा झाला हे अजून स्पष्ट होऊ शकलेले नाही. आरोपी प्रवीनकुमार उर्फ टोनी आणि त्याची वहिनी व प्रेमिका रजनी जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत याचा खुलासा होणे अवघड असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
- पोलिसांनी मृत सुरेश रानीच्या अस्थी गोळा करुन पटियाला मेडिकल कॉलेजच्या फॉरेन्सिक लॅबला पाठवल्या आहेत.
- हत्येनंतर आरोपींनी सोमवारी सायंकाळी सुरेश रानीवर अंत्यसंस्कारही केले होते.
- सुरेश रानीला दोन मुले आहेत. सासू-सासरे ह्यात नसल्यामुळे घरात आरोपी प्रवीनकुमार त्याची पत्नी सुरेश रानी आणि वहिनी रजनी राहात होते.
- सुरेश रानीचे माहेर अंबाला येथे आहे. तिचे वडील करनैल सिंग यांनी दिलेल्या तक्रारीनंतर दीर-भावजयविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुलांना काहीच माहित नाही
- तपास अधिकारी बलबीरसिंग यांनी सांगितले, की मुलांना या घटनेबद्दल काहीच माहित नाही.
- आरोपींना अटक झाल्यानंतरच हत्या केव्हा आणि कशी केली याचा खुलासा होईल.
- ही घटना पोलिसांना माहित होईपर्यंत मृत सुरेश रानीवर अंत्यसंस्कार झालेले होते.
- त्यामुळे पोलिसांनी अस्थी ताब्यात घेऊन फॉरेन्सिक टेस्टसाठी पाठवल्या आहेत. त्यातून काही पुरावा मिळण्याची पोलिसांना आशा आहे.
पुढील स्लाइडमध्ये इन्फोग्राफिक्समध्ये समजून घ्या संपूर्ण प्रकरण...
बातम्या आणखी आहेत...