आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पतीने केली पत्नीची निर्घृण हत्या, गरम इस्त्रीने जाळून घेतले प्राण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोगा - पंजाबच्या मोगा येथील बेदी नगरमध्ये बुधवारी सकाळी सुमारे 8.30 वाजता मारहानीनंतर तरुणाने पत्नीची छाती इस्त्रीने जाळून तिची हत्या केल्याचे समोर आले आहे. आरडाओरडा ऐकल्यानंतर जेव्हा शेजारी दार तोडून आत आले त्यावेळी महिलेचा मृत्यू झाला होता. लोकांनी आरोपीला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केले.

शेजा-यांनी घरात गेल्यानंतर इस्रीची वायर काढून मृत पुजा रानी (37) हिच्या शरीरावरून इस्त्री हटवली होती. त्यावेळी खोलीत तिचा पती एका कोप-यात बसलेला होता. त्याच्या हातातून रक्त वाहत होते. पुजाचा भाऊ जेव्हा आपल्या मामाबरोबर घटनास्थळी पोहोचला त्यावेळी त्यावेळी त्याच्या बहिणीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. तर 40 वर्षांचा जिम्मी खाली बसलेला होता. पत्नीने आत्महत्या केल्याचे सांगितले. त्यांना दोन मुली आणि एक मुलगा होता.

एएसआय सतनाम सिंह यांच्या मते तपासात असे समोर आले की, जिम्मीने आधी त्याच्या पत्नीला बेदम मारहान केली. नंतर या प्रकरणाला आत्महत्येचे रुप देण्यासाठी तिच्या छातीवर इस्त्री ठेवली. कुटुंबीयांनी जिम्मीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, PHOTOS...