आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या Judge ला बेदम मारले, हाताच्या नसा कापल्या, पंख्याला टांगले, वाचा पतीचे कृत्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कानपूर (उत्तर प्रदेश)- ज्युडिशिअल मॅजिस्ट्रेट प्रतिभा गौतम यांची आत्महत्या नसून गळा दाबून हत्या करण्यात आल्याचे उघडकीस आल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. हत्येपूर्वी प्रतिभा यांना लाकडी दांडक्याने जबर मारहाण करण्यात आली होती. त्यांच्या पायांवर आणि छातीवर तब्बल 20 गंभीर जखमा झाल्या होत्या. एका हाताच्या नसा आठ वेळा तर दुसऱ्या हाताच्या पाच वेळा कापण्यात आल्या होत्या. त्यांच्या पोटात तीन महिन्यांचा गर्भ होता अशीही माहिती समोर आली आहे. आत्महत्येचा बनाव करण्यासाठी त्यांचा पती अभिषेकनेच गळफास घेतल्याचा बनाव केला होता.
अतिरिक्त पोलिस आयुक्तांनी सांगितले
- कानपुरचे अतिरिक्त पोलिस आयुक्त शलभ माथूर यांनी सांगितले, की पती-पत्नीमध्ये कडाक्याचे भांडण झाले होते. बऱ्याच दिवसांपासून दोघांमध्ये तणावाचे वातावरण होते. व्हॉट्सअॅप मेसेजेसवरुन दोघांमधील तणावपूर्ण संबंधांचा खुलासा झाला आहे.
- आभिषेकने सुसाईड दाखवण्यासाठी सगळे प्रकरण रंगवले होते. प्रतिभाला त्याने जिवे मारण्याची धमकीही दिली होती.
- अभिषेकला अटक करण्यात आली आहे. त्याच्या आईवडीलांचीही चौकशी करण्यात येत आहे. मनू म्हणतोय, की मी सगले कबुल केले आहे. मला तुरुंगात टाका.
काय आहे संपूर्ण प्रकरण
- शनिवारी रात्री माती कोर्टाच्या न्यायाधीश प्रतिभा शुक्ला यांनी दोन्ही हातांच्या नसा कापून फाशी घेतल्याचा बनाव करण्यात आला होता.
- पोलिसांना याची माहिती देण्यात आली. पोलिस आले तेव्हा प्रतिभा यांचा मृतदेह जमिनीवर पडला होता. हाताच्या नसा कापल्या होत्या.
- अभिषेकने सांगितले होते, की रविवारी सकाळी घरी आलो तेव्हा प्रतिभाचा मृतदेब पंख्याला अटकलेला आढळून आला.
- शनिवारी आम्ही दोघे सोबत होतो. पण आमचे भांडण झाले. त्यानंतर प्रतिभा घरी आली होती.
- त्यानंतर रविवारी मी घरी आलो. बराच वेळा बेल वाजवली. पण कुणी दार उघडले नाही. म्हणून दार तोडून आता आलो.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, न्यायाधीश प्रतिभा गौतम यांचे काही फोटो.....
बातम्या आणखी आहेत...