आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पतीने पत्नीला विना कपड्याचे लटकवले फासावर, सासूने मृतदेह पाहिला तर किंचाळत पडली बाहेर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंबिकापूर/बिलासपूर (छत्तीसगड) - शहरात पाच दिवसांपूर्वी एका महिला स्वतःच्या घरात नग्नावस्थेत फासावर लटकलेली आढळली होती. पोलिसांनी या प्रकरणाचे गुढ उकलले आहे. पत्नीच्या टॉर्चरला वैतागून पतीने झोपेत तिची गळा आवळून हत्या केली होती. त्यानंतर मृतदेह फासावर लटकवला होता. महिला झोपण्यापूर्वी नग्नावस्थेत होती त्यामुळे फासावरही ती त्याच आवस्थेत आढळून आली होती.
 
पतीकडे करायची पैशांची मागणी 
- आरोपीने चौकशीत सांगितले की त्याचे पत्नीवर प्रेम होते, मात्र ती त्याच्यासोबत राहाण्यास तयार नव्हती. त्याच्याकडे पैशांची मागणी मात्र करत होती. आरोपीने सांगितले की पाच वर्षांपूर्वी तिने त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला होता. त्या आरोपात तीन महिने कैदेची शिक्षा देखील झाली होती. 
- महिला जामीनावर सुटल्यानंतर आरोपीने तिला माफ करत पुन्हा सोबत राहाण्यास तयार झाला होता. मात्र त्यानंतरही तिच्या वागण्यात फरक पडला नाही. हेच तिच्या हत्येचे कारण असल्याचे आरोपीने पोलिसांना सांगितले. 
 
ओढणी तुटल्याने महिला पडली होता खाली
- पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला तेव्हा ज्या रॉडला मृतदेह लटकलेला होता तिथे एक ओढणी फाटलेली दिसत होती. ओढणीचा दुसरा भाग मृतदेहाच्या गळ्यात फासासारखा होता. 
- आरोपीने सांगितले, की पहिले त्याने ओढणीने गळा आवळला आणि त्याच ओढणीचा गळफास बनवून तिला रॉडला लटकवले आणि तो रुम बाहेर पडला. त्याचा चष्मा आत राहिल्यामुळे तो चष्मा घेण्यासाठी आतमध्ये आला तेव्हा ओढणी फाटून महिला खाली पडलेली होती. तेव्हा तिचा श्वासोच्छास सुरु होता. 
- आरोपीने नंतर लुंगीचा गळफास बनवून तिला पुन्हा फाशी दिली. त्यामुळे महिलेच्या गळ्यात दोन फास होते आणि रॉडला ओढणीचा तुकडा लटकलेला होता. 
 
मृत महिलेच्या पित्याने केला होता तिच्या पतीवर हत्येचा आरोप 
- ३० वर्षीय अर्चना केरकट्टाचा मृतदेह गुरुवारी सकाळी तिच्या घरात नग्नावस्थेत फासावर लटकलेला आढळला होता.
- सर्वप्रथम महिलेच्या सासूने तिचा या आवस्थेतील मृतदेह पाहिला तेव्हा तिची गाळण उडाली होती. सासू ओरडतच घराबाहेर पळाली. 
- मृत महिलेच्या पित्याने तिच्या पतीवर हत्येचा आरोप केला होता. त्या दिशेन पोलिसांनी चौकशी करावी असे महिलेच्या पित्याने पोलिसांना म्हटले होते. 
- पोलिसांनी घटनास्थळाची पाहाणी करुन अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला होता. 
 
बातम्या आणखी आहेत...