आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉक्टर पती म्हणाला- माझ्या मित्राला तुझ्यासोबत झोपायचे आहे; नकार दिल्याने पत्नीला केले असे काही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पत्नीने पतीवर धक्कादायक आरोप केला. - Divya Marathi
पत्नीने पतीवर धक्कादायक आरोप केला.
लखनऊ - शहराच्या आंबेडकर नगरमध्ये एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. पत्नीचा आरोप आहे की, पती त्याच्या मित्रांशी शारीरिक संबंध बनवण्यासाठी दबाव टाकतो. अनेक दिवसांपासून छळ होत असल्याने पत्नीने शुक्रवारी पोलिसांत तक्रार दिली. डॉक्टर पती आणि त्याच्या मित्रांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
तुझ्यासोबत माझ्या मित्राला झोपू दे, बोल तुझा काय रेट आहे?
- जिल्हा रुग्णालयात बालरोग विशेषज्ञ म्हणून डॉ. राकेश सिंह काम करतो. पत्नी दिव्या (बदललेले नाव) चा आरोप आहे की, पतीने अनेकदा माहेरच्यांना हुंड्यात एक-दोन लाख रुपयांची मागणी केली. लग्नानंतर मला कळले की, एवढा शिकला-सवरलेला असूनही तो एवढा घाणेरडा आहे.
- मागच्या काही दिवसांपासून तो  घरातच रात्री उशिरापर्यंत मित्रांसह  दारू पितो. मित्रांसह शारीरिक संबंध बनवण्यासाठी दबाव टाकतो. नकार दिल्यावर मारहाण करतो.
- मी काही ऑडिओ क्लिप्सही पोलिसांना पुरावा म्हणून दिल्या आहेत. यात डॉ. राकेश माझ्याशी फोनवर म्हणतोय की- माझ्या मित्राला तुझ्यासोबत झोपायचे आहे. सांग तुझा रेट काय आहे?
- एवढेच नाही, ऑडिओ क्लिपमध्ये असे ही आहे की, मी एका प्रॉस्टिट्यूटसोबत काम करतो, सोबत झोपण्याचे 10 हजार देतो, तू घेतेस का?
 
100 नंबरवर फोन करून वाचवला जीव
- दिव्याचा आरोप आहे की, एप्रिल 2017 मध्ये डॉक्टरांचे मित्र राजेश सिंहशी संबंध बनवण्यासाठी नकार दिल्यावर मला बेदम मारहाण झाली. कानाचा पडदाही फाटला.
- खोलीत बंद करून गॅसचा पाइप उघडून मला जाळण्याचा प्रयत्न केला. 100 नंबरवर फोन केल्यावर माझा जीव वाचला. डॉक्टरचे अनेक तरुणींशी अवैध संबंध आहेत. तो बऱ्याचदा रात्रीचा घरी येत नाही.
 
दोघांचेही दुसरे लग्न
- पोलिसांच्या माहितीनुसार, 2015 मध्ये दोघांनीही हे दुसरे लग्न केले. पहिल्या पत्नीकडून डॉक्टरला दोन मुले आहेत, तर दिव्याला पहिल्या पतीकडून 2 मुले होती. पण तिने त्यांना आपल्या नव्या सासरी आणले नाही. डॉक्टरच्या पहिल्या पत्नीचा मृत्यू हार्ट अटॅकने झाला होता.
 
काय म्हणतात पोलिस?
- पोलिस अधिकारी शकुंतला उपाध्याय म्हणाल्या, महिलेच्या तक्रारीवरून डॉक्टर आणि त्याचा मित्र राजेशविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. महिलेने काही ऑडिओ रेकॉर्डिंगही दिल्या आहेत. तपास सुरू आहे.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी फोटोज...
बातम्या आणखी आहेत...