आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हुंड्यासाठी बायकोला दिल्या अशा यातना, आई-वडिलांसमोर केले क्रूर कृत्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नालंदा (बिहार) - येथील एका युवकाने हुंड्यासाठी आई-वडीलांसमोर स्वतःच्या पत्नीला विवस्त्र करुन तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये गरम रॉड घुसवला. ती बेशुद्ध होत नाही तोपर्यंत तो हे अमानुष कृत्य करत राहिला. पत्नी बेशुद्ध झाल्यानंतर घरातील लोकांनी तिला उचलून बाहेर फेकले. या घटनेनंतर पीडितेने तिच्या आई-वडीलांसह पोलिस स्टेशन गाठले आणि पती, सासू, सासऱ्याविरोधात तक्रार दिली.
एक वर्षांपूर्वी झाले होते लग्न
- पीडितेने तक्रारीत म्हटल्यानुसार, एक वर्षांपूर्वी तिचे लग्न संतोष चौधरीसोबत झाले होते.
- लग्नानंतर काही महिन्यांतच संतोष आणि त्याच्या कुटुंबीयांनी हुड्यांपोटी एक लाख रुपये आणि एका बाइकची मागणी केली.
नातेवाईकांच्या घरात केले क्रूर कृत्य
- पीडितेने सांगितले की हुंडा मिळत नाही हे कळाल्यानंतर तिच्या सासरच्या लोकांनी गुरुवारी तिला एका नातेवाईकाच्या घरी नेले.
- येथील एका रुममध्ये तिच्या नवऱ्याने सर्वांसमोर तिला विवस्त्र केले.
- त्यानंतर पतीने एक लोखंडी रॉड गरम करुन स्वतःच्या आई-वडिलांसमोर तिच्यावर अत्याचार केले. जोपर्यंत पीडिता बेशुद्ध होत नाही तोपर्यंत त्याचे हे कृत्य सुरु होते.
- आरोपींनी बेशुद्ध अवस्थेत पीडितेला घराबाहेर फेकले.

रात्रभर होती बेशुद्ध
- पीडितेने सांगितले, की घराबाहेर फेकल्यानंतर ती रात्रभर बेशुद्ध होती.
- शुक्रवारी सकाळी जेव्हा शुद्धीवर आली तेव्हा तिने कसेतरी आई-वडीलांचे घर गाठले.
- माहेरी आल्यानंतर पीडितेने आई-वडिलांना घेऊन महिला पोलिस स्टेशनमध्ये पती, सासू, सासरा, दीर, नणंदेविरुद्ध तकार दाखल केली.
- पोलिसांनी पीडितेला उपचारांसाठी हॉस्पिटलमध्ये पाठवले.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, आई-वडिलांना घेऊन पोलिस स्टेशनला आली पीडिता...
बातम्या आणखी आहेत...