आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नी असताना दुसरे लग्न, पहिल्याच रात्री सांगितले तुला वडिलांसाठी खरेदी केले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पीडिता आणि आरोपी पती - Divya Marathi
पीडिता आणि आरोपी पती
मऊ (उत्तर प्रदेश) - येथील एका अल्पवयीन मुलीसोबत एका व्यक्तीने लग्न केले आणि मधुचंद्राच्या रात्री तिला सांगितले की आपले लग्न झाले असले तरी, तूला 16 हजार रुपयांत सासर्‍यासाठी खरेदी केले आहे. आरोपीने युवतीला हे देखील सांगितले, की हा सौदा तुझ्या आई-वडिलांना सांगून झाला आहे. त्यांना याची पूर्ण कल्पना होती. युवतीच्या तक्रारीनंतर पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.
काय आहे प्रकरण
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, बरईपूर येथील एका व्यक्तीने एक महिन्यापूर्वी शेजारच्याच गावातील अल्पवयीन मुलीबरोबर लग्न केले. मधुचंद्राच्या रात्री त्या व्यक्तीने युवतीला सांगितले, की मी विवाहित असून मला एक मुलगी आहे. तुला माझ्या वडिलांसाठी अर्थात तुझ्या सासर्‍यांसाठी 16 हजार रुपयांत खरेदी करण्यात आले आहे. तुझ्या आई - वडिलांच्या संमतीनेच हा सौदा झाला आहे. थोड्यावेळाने युवतीचा सासरा त्या खोलीत आला आणि बलात्काराचा प्रयत्न केला.मात्र युवतीने त्याला पळवून लावले.
शेजारच्यांच्या मदतीने पलायन
काही दिवसांनंतर 'मुंह दिखाई' कार्यक्रमात युवतीने तिच्या सोबत झालेल्या फसवणूकीची माहिती शेजार्‍यांना दिली आणि त्यांच्याकडे मदतीची याचना केली. काही दिवसानंतर युवती सासरहून पळून गेली आणि तिने थेट पोलिस अधीक्षकांचे कार्यालय गाठले. तिथे सर्व हकिकत सांगितल्यानंतर पोलिस अधीक्षकांनी संबंधीत पोलिस ठाण्याला आरोपींविरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश दिले.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, घटनेशी संबंधीत फोटो